ओझर : दुचाकी अपघातात एचएएल अधिकाऱ्याचा मृत्यू
नाशिक

ओझर : दुचाकी अपघातात एचएएल अधिकाऱ्याचा मृत्यू

मंगळवारी घडली घटना

Gokul Pawar

Gokul Pawar

ओझर | Ozar

येथील मुंबई आग्रा महामार्गाला समांतर असलेल्या सर्व्हिस रोडवर अँक्टिव्हा दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एच ए एल अधिकाऱ्याचा मृत्यू झाला.

ज्ञानेश्वर बारकू जोंधळे (५६) असे या अधिकाऱ्यांचे नाव आहे. ते रात्री दहा वाजेच्या सुमारास अँक्टिव्हा दुचाकीने (एमएच १५ एफजे ०६३०) सर्व्हिस रोडने दुर्गामंदिर कडून मेनगेटकडे येत असताना एचएएल च्या वाहन प्रवेश द्वाराजवळील स्पिडब्रेकरजवळ त्यांची दुचाकी घसरली. या अपघातात ते खाली पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा मृत्यु झाला.

या बाबत ओझर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास ओझर पोलिस करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com