
नाशिक । प्रतिनिधी| Nashik
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले [Nana patole] यांनी नाशिक [nashik]मध्ये हात से हात जोडो अभियानाचा शुभारंभ केल्यानंतर आता शहरातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत [citizens] ते अभियान पोहोचविण्यासाठी काँग्रेसच्या [congress] पदाधिकाऱ्यांनी काम सुरू केले आहे.
पंचवटी [panchavati] ब्लॉक काँग्रेसच्यावतीने राहुल गांधी यांच्या भारत जोडो [Bharat Jodo] यात्रेचा पुढचा टप्पा म्हणून हातसे हात जोडो हे अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानास प्रमुख उपस्थिती म्हणून नाशिक काँग्रेसचे प्रभारी ब्रिज किशोर दत्त, कार्यक्रमाचे अध्यक्ष नाशिक शहर काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर उपस्थित होते.
विमुक्त जाती व भटक्या जमातीचे नाशिक शहर जिल्हा अध्यक्ष शरद बोडके यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक शहर महिला काँग्रेसचे सोनाली शरद बोडके यांनी केले होते. आगामी दोन महिने हे अभियान शहरातील विविध भागात सुरू राहणार असून काँग्रेसची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
राहुल गांधी [Rahul Gandhi] यांचे एक पत्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे अभियान महाराष्ट्रात राबविले जात आहे. याप्रसंगी पंचवटी ब्लॉकचे अध्यक्ष उद्धव पवार, मंगूलाल जाधव, संतोष साळवे, स्वप्नील सिन्नरकर, विठ्ठल कचरे, शंकर वाघ, सागर शिरार, हिरामण कालवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.