राशेगाव शिवारात लाखोंचा गुटखा जप्त

राशेगाव शिवारात लाखोंचा गुटखा जप्त

ओझे । वार्ताहर Oze-Dindori

महाराष्ट्र राज्यात (Maharashtra State) प्रतिबंधित असलेल्या सुमारे 29 लाख 70 हजाराचा गुटखा, सुगंधी तंबाखू (Tobacco) व पान मसाला गुजरात (Gujrat) हुन आयशर ट्रक मधून महाराष्ट्रात आणत असताना दिंडोरी (Dindori) पोलिसांनी (Police) रासेगाव (Rashegaon) शिवारात पकडला असून वाहनचालक बंधूंना अटक केली आहे.

आयशर वाहन क्रमांक (एम. एच - 09 सीयू- 5634) हिची दिंडोरी पोलिसांनी तपासणी केली असता त्यात महाराष्ट्र शासनाने आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधक केलेला अन्न पदार्थ, सुगंधी गुटखा, पान मसाला व सुगंधी तंबाखूची गुजरातमधून चोरटी वाहतूक करत महाराष्ट्रात विक्री करण्याच्या उद्देशाने आणल्याचे आढळून आले.

मानवी शरीरावर अपायकारक परिणाम करणारे कर्क रोगासारखे (Cancer) दुर्धर आजार व मृत्यूस निमंत्रण करणारा 23,76,000 रुपये किमतीचा गीतांजली 5000 पान मसाला एका पिवळ्या गोणीमध्ये 04 सफेद छोटया गोण्या पैकी एका छोटया सफेद गोणीमध्ये 55 पाकिटे असे एकून 19800 पाकिटे 120, 05,94,000/- रुपये किंमतीचा जी-1- 5000 सुगंधित तंबाखू एका सफेद गोणीमध्ये 04 सफेद छोट्या गोण्या पैकी एका छोट्या सफेद गोणीमध्ये 55 पाकिटे असे एकून 19800 पाकिटे 30 असा एकूण 29,70,000 रुपये किमतीचा अन्न पदार्थ आपले कबज्यात बाळगून स्वतःचे फायदेसाठी त्याची विक्री करण्याचे उद्देशाने ते जाणीवपूर्वक मानवी आरोग्यास व सेवनास अपायकारक असल्याचे माहित असतांना देखील चोरट्या पध्दतीने आयशर टेम्पोतुन महाराष्ट्रात प्रतिबंधीत केलेला अन्नपदार्थ बाळगुन त्याची वाहतुक करीत असतांना आढळला.

सदर प्रकरणी सलीम यासीन काझी, वय-32 वर्षे रा. कर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर ,वाहनचालक रसूल यासीन काझी 30 वर्षे रा. करकंब ता. पंढरपूर, जि. सोलापूर, व्ही. आर. एल. लॉजीस्टीक सुरत, व्ही. आर. एल.लोनीस्टीक जोधपुर, व्ही. आर. एन. लॉजीस्टीक सोलापुर, उत्पादक पेढी दिनेश फ्राग्रेस, पाली रोड, मोगरा जोधपुर फ्रास नेला मंगला, बंगलोर व दिनेश फाग्रस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मुद्देमालासह आयशर जप्त केला असून वाहनचालक व त्याचे सोबत असलेल्यास अटक केली आहे. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी योगेश रोहिदास देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com