लाखो रुपयांचा गुटखा जप्त

लाखो रुपयांचा गुटखा जप्त

दिंङोरी । प्रतिनिधी Dindori

नाशिक -पेठ -धरमपुर ( Nashik- Peth- Dharampur Road ) मार्गावरील गोळशी ( Golshi Toll Plaza ) टोलनाक्यावर लाखो रूपयाचा बेकायदा गुटखा( Gutkha) नाशिक जिल्हा वाहतुक शाखेच्या भरारी पथकाने पकडला असून दिंडोरी पोलिस ठाण्यात ( Dindori Police Station )गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक पेठ धरमपुर मार्गाने गुजरात कडून चोरट्या मार्गाने बेकायदारित्या पिक अप क्र.एम एच -१५ एच एच १०८७ नाशिक कडे येत असतांना मिळालेल्या गोपनीय माहिती गोळशी टोलनाक्यावर वाहतूक शाखेच्या पथकाने गाडी थांबवून तपासणी केली

तपसणी दरम्यान सुंगधी तंबाखू व विमल गुटखा गोण्या मिळून आल्या असून वाहनासह २१ लाख ८० हजार ९२० रू मुदेमाल जप्त करण्यात आला आहे. सदर मुद्देमाला सह वाहन दिंडोरी पोलिसात जमा करण्यात आले असून, वाहन चालक मुझेद्दिमशेख याला ताब्यात घेण्यात आहे.

नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांच्या आदेशान्वये पोलिस निरीक्षक दिनेश बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कैलास देशमुख, पोलिस नाईक सागर सौदागर पोलिस कॉस्टेबल दत्तू शिंदे, रूपेश कांबळे,चालक शिंपी यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com