इगतपुरीत लाखोंचा गुटखा जप्त

इगतपुरीत लाखोंचा गुटखा जप्त

इगतपुरी | जाकीर शेख Igatpuri

तालुक्यातील घाटनदेवी Ghatan Devi Mandir भागातून ३० लाख रुपये किमतीच्या गुटख्याची 33 पोती जप्त Gutkha seized करण्यात आली आहेत. इगतपुरीचे नगरसेवक संपत डावखर यांनी महामार्ग पोलीस केंद्र घोटीचे पोलीस उपनिरीक्षक अमोल वालझाडे यांना याबाबत माहिती कळवली. त्यानुसार त्यांनी घटनास्थळी भेट देऊन गुटख्याची 33 पोती अंदाजे किंमत ३० लाख जप्त केली. इगतपुरी पोलीस ठाण्याकडे Igatpuri Police Station पुढील कार्यवाहीसाठी प्रकरण सोपवण्यात आले असून पोलिसांकडून कसून तपास सुरू करण्यात आला आहे.

आज दुपारी घाटनदेवी भागात नगरसेवक संपत डावखर गेले असता काही आदिवासी मुलांच्या हातात गुटख्याची पाकिटे त्यांना आढळली. त्यांनी अधिक चौकशी केली असता ह्या परिसरात गुटख्याचा ट्रक असल्याचे समजले. त्यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक अमोल वालझाडे यांना माहिती दिली. वालझाडे यांनी आपल्या पथकासह भेट दिली.

घटनास्थळी 33 मोठे सफेद रंगाचे पोते त्यामध्ये SAK असे इंग्रजी अक्षर लिहिलेले पाकिटे होते. त्याचा उग्र गुटख्याचा वास येत होता. सर्व साधारण 30 लाख रुपये किमतीचा गुटखा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत तात्काळ इगतपुरी पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. ठाणे कंट्रोल, मुंबई कंट्रोलला सुद्धा माहिती कळविण्यात आलेली आहे.

इगतपुरीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजाराम दिवटे, शेंडे, जाधव यांच्या ताब्यात माल देण्यात आला. पुढील तपासासाठी इगतपुरी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com