जानोरी । Janori

दिंडोरी तालुक्यातील गोळशी फाटा शिवारात नाशिक- पेठ रस्त्यावरील झालेल्या कारवाईत दिंडोरी पोलिसांनी 53 लाखाचा गुटख्यासह 63 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दरम्यान नाशिक- पेठ रस्त्यावर एका ट्रकमध्ये गुटखा असल्याची गोपीनिय माहिती दिंडोरी पोलिसांना मिळाली. यानंतर दिंडोरी पोलिसांनी समजताच रचत अवैध रित्या वाहतूक होत असलेल्या लाल रंगाच्या अशोक लेलन ट्रकला ताब्यात घेतले.

यावेळी या वाहनात महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला सुंगधित गुटखा व सुंगधित पानमसाला तंबाखु तसेच गुटखा पावडर असा एकुण 53 लाख रुपयाचा गुटखा तयार करण्याचा माल मिळून आला. हा ट्रक सिलवासा येथून पेठमार्गे नाशिककडे घेऊन जात असताना हि कारवाई केलेई.

ट्रक चालक दत्तात्रय रामलिंग जामदार (38) रा.मु.पो.सस्तापूर, ता. बसव,कल्याण, जि. बिलदर याच्या विरुध्द दिंडोरी पोलिस ठाण्यामध्ये दाखल गुन्हा करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, सचिन नवले तसेच पोलिस हवालदार धनंजय शिलवाटे, योगेंद्रसिंग राठोड, युवराज खांडवी, युवराज चव्हाण, मधुकर बेंडकूळे करीत आहे.