गणेश मंडळांना मनपाद्वारे मार्गदर्शक सूचना
नाशिक

गणेश मंडळांना मनपाद्वारे मार्गदर्शक सूचना

सातपूर मनपाच्या वतीने गणेश मंडळ यांची बैठक

Ravindra Kedia

Ravindra Kedia

सातपूर | प्रतिनिधी Satpur

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विभागातील पाचही प्रभागातून साजऱ्या केल्या जाणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव बाबत मार्गदर्शक सूचना देण्यासाठी सातपूर मनपाच्या वतीने गणेश मंडळ यांची बैठक आयोजित करण्यात आली होती

या बैठकीसाठी पाचही प्रभागाच्या नगरसेवकांना या प्रभागांमधील सुमार 30 ते 35 सार्वजनिक मंडळांना निमंत्रित करण्यात आले होते या बैठकीत नगरसेविका नयना गांगुर्डे सन्माननीय नगरसेवक विजय भंदूरे उपस्थित होते. तसेच विभागातील सत्र मंडळ प्रतिनिधी बैठकीसाठी आले होतेया बैठकीत प्रभाग सभापती संतोष गायकवाड विभागीय अधिकारी लक्ष्मण गायकवाड बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय पाटील कनिष्ठ अभियंता राजेंद्र सोनवणे यांनी मार्गदर्शन केले

सार्वजनिक गणेशोत्सवाची मूर्ती चार फुटांच्या आत असावी घरगुती गणेशाची मूर्ती दोन फुटाच्या आत ठेवावी मंडळाचे मंडप छोटे असावे रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी सारख्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन करावे कोविडच्या पार्श्वभूमीवर कवि होऊन आजाराचा प्रादुर्भाव पसरणार नाही यादृष्टीने नियोजन करावे आदींसह विविध सूचना मांडण्यात आल्या

यावेळी सभापती संतोष गायकवाड यांनी शक्य झाल्यास सार्वजनिक मंडळांनी एकत्र येत हे एक गाव एक गणपती ही परंपरा सुरू करण्याचे आवाहन केले

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com