खेळाडूंना अप्पर आयुक्तांकडून मार्गदर्शन

खेळाडूंना अप्पर आयुक्तांकडून मार्गदर्शन

हरसूल । वार्ताहर | Harsul

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) दुर्गम भागातील ठाणापाडा (thanpada) माध्यमिक व उच्य माध्यमिक आश्रमशाळेच्या सात खेळाडूंनी (players) वेगवेगळ्या क्रिडा प्रकारात डिसेंबर 2019 मध्ये झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत (state level competition) विशेष प्राविण्य प्राप्त केले होते.

सध्या हे विद्यार्थी (students) आदिवासी क्रिडा प्रबोधनी नासिक (Tribal Sports Awareness Nashik) या ठिकाणी खेळाचे प्रशिक्षण (education) व महाविद्यालयीन शिक्षण (College education) घेत आहेत. त्यात पाच मुली व दोन मुलांचा समावेश आहे. या प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांनी नुकतीच आदिवासी विकास विभाग अप्पर आयुक्त संदीप गोलाईत (Tribal Development Department Upper Commissioner Sandeep Golait), तसेच एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा अधिकारी वर्षा मीना (ntegrated Tribal Development Department Project Officer and Assistant District Officer Varsha Meena) यांची सदिच्छा भेट घेतली.

या भेटीदरम्यान वरिष्ठांनी विद्यार्थ्यांना (students) सखोल मार्गदर्शन करत अभिनंदन केले. ठाणापाडा येथील प्राविण्य प्राप्त खेळाडूंनी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात डिसेंबर 2019 दरम्यान राज्यस्तरीय स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळविले होते. या खेळाडूंना आदिवासी विकास विभाग (Department of Tribal Development) मागासवर्गीय कल्याण वैयक्तिक लाभाच्या राज्ययोजने अंतर्गत प्रोत्साहन पर तीस हजार रुपयाचा निधी (fund) देवुन एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी, तथा सहाय्यक जिल्हा अधिकारी वर्षा मीना यांनी गौरव करुन अभिनंदन केले.

तसेच आदिवासी विकास विभाग अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी स्पर्धा परिक्षा (Competitive Examination), खेळाची तयारी करत असतांना अभ्यासाची तयारी कशी करावी ? वेळेचे महत्व, ध्येय निश्चित करुन ते प्राप्त होईपर्यत जिद्द व चिकाटी प्रयत्न करणं आश्या वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले.

त्यात मंदा सूभाष निखंडे (200 मी. धावणे ) सुर्वण पदक, महेश पखाणे (1500 मी. धावणे) सुर्वण पदक, कविता वड, निर्मला बरफ, मणीषा खेत्रे, वनिता पवार (4.400 19 वर्ष आतील मुली रिले) सुर्वण पदक, रविंद्र शिंगाडे (4. 400 कास्य पदक) या खेळाडूंना क्रीडाशिक्षक एस. जे. कटारे, अधिक्षक अरुण बागले अधिक्षिका पुनम बागले, मुख्याध्यापक ए. एस. चौरे, एस. सी. शेंडे यांनी भेट घडवून आणली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com