'स्मार्ट देवळाली'साठी कॅन्टोन्मेंट सरसावले

'स्मार्ट देवळाली'साठी कॅन्टोन्मेंट सरसावले

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp

स्वच्छता भारत अभियानअंतर्गत (swachhta bharat abhiyan) देशभरात चौथा व राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड (Deolali Cantonment Board) नागरिकांना आरोग्याच्या बाबतीत सतर्कता दाखवत कचरा विलीनीकरण या बरोबरच 'स्मार्ट देवळाली'साठी (Smart Deolali) मार्गदर्शन सुरू केले आहे...

येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून (Health Department) सुका कचरा आणि ओला कचरा याचे यांचे वेगवेगळे वर्गीकरण करणे. आरोग्यासाठी करावयाच्या इतर उपाययोजना या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गजभिये, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता, सहायक आरोग्य निरीक्षक शिवराज चव्हाण, अतुल मुंढे यांनी नागरिकांना घरोघरी जाऊन प्रात्यक्षिक करून दाखविले.

याशिवाय नागरिकांच्या विविध प्रकारच्या समस्यादेखील समजून घेतल्या. दररोजचा दैनंदिन कचरा वेगवेगळ्या स्वरूपात घंटागाडीमध्ये देऊन प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com