सरपंच संसदेत ग्रामीण समस्यांवर मार्गदर्शन

सरपंच संसदेत ग्रामीण समस्यांवर मार्गदर्शन

अभोणा, कळवण । वार्ताहर | Abhona | Kalvan

‘एमआयटी, पुणे’ (MIT, Pune) शिक्षणसंस्थासमूहाच्या ‘एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट’ (MIT School of Government) अंतर्गत स्थापित ’एमआयटी - राष्ट्रीय सरपंच संसद’ (MIT - National Sarpanch Parliament) व ‘ नाशिक विभागीय आयुक्त विभाग’ (Nashik Divisional Commissioner's Department) यांच्या संयुक्त विद्यमाने कळवण तालुका (kalwan taluka) - सरपंच संसदेचे (Sarpanch Parliament) आयोजन करण्यात आले होते.

कळवण तालुक्यातील सर्व सरपंच व उपसरपंचांना या संसदेसाठी निमंत्रित करण्यात आले. कळवण पंचायत समितीच्या (Kalvan Panchayat Samiti) सभागृहात ही सरपंच संसद अतिशय उत्साहात संपन्न झाली. कळवण तालुका - सरपंच संसदेत कळवण उपविभागीय अधिकारी विकास मीना (Reporting Sub Divisional Officer Vikas Meena), कळवणचे तहसीलदार बंडु कापसे, कळवण गटविकास अधिकारी निलेश पाटील यांनी सरपंचांनी प्रातिनिधिक स्वरूपात सादर केलेल्या कळवण तालुक्यातील ज्वलंत ग्रामविकासविषयक समस्यांचे निराकरण करून शासनाच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन केले.

‘एमआयटी - राष्ट्रीय सरपंच संसदे’चे प्रमुख समन्वयक योगेश पाटील यांनी ‘सरपंच संसद’ उपक्रमामागील संयोजनभूमिका सांगितली. सहसमन्वयक प्रकाशराव महाले यांनी प्रास्ताविक केले. ग्रामविकासतज्ञ समितीचे समन्वयक बाजीराव खैरनार यांनी प्रारंभी प्रमुख वक्ते व सरपंचांचे स्वागत केले. नाशिक विभाग समन्वयक संजय भांबर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कळवण तालुका समन्वयक योगेश चव्हाण (सरपंच - मानूर), तालुका संघटक सुनीताताई पवार (सरपंच - अभोणा) व तालुका सहसमन्वयक व पत्रकार देवेंद्र ढुमसे (उपसरपंच - वंजारी) हे व्यासपीठावर होते.

भादवनचे उपसरपंच प्रवीण जाधव, सुपले दिगरचे सरपंच रघुनाथ महाजन, चणकापूरचे ज्ञानदेव पवार, पळसदरचे सरपंच छबुनाथ कुवर, मानुरचे उपसरपंच रवि बोरसे, मोहंदराच्या सरपंच जयश्रीताई कैलास चव्हाण, मोहंदरच्या ज्येष्ठ नागरिक माजी विस्तार अधिकारी सुमनताई भोये यांनी सरपंच संसदेत कळवण तालुक्यातील ग्रामविकास व महसूल विषयक असणार्‍या विविध, ज्वलंत व प्रातिनिधिक समस्यांचे अभ्यासपूर्वक सादरीकरण केले. ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासाशी निगडित विविध ज्वलंत’ प्रश्नांचे निराकरण होण्यासाठी प्रशाकीय अधिकारी व सरपंच यांच्यात विधायक संवाद घडवणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. ‘एमआयटी, पुणे’ शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष राहुल कराड व नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे या उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आहेत

‘नाशिक महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी’चे संचालक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर हे संयोजन मार्गदर्शक आहेत. ‘एमआयटी - राष्ट्रीय सरपंच संसदे’चे कळवण तालुक्यातील खर्डेदिगर गणाचे समन्वयक भगवान बागुल (सरपंच - खर्डेदिगर), खर्डेदिगर गणाचे संघटक विजय गांगुर्डे (सरपंच - काठरे), मोकभणगी गणाचे समन्वयक श्री.प्रवीण जाधव (उपसरपंच - भादवन), निवाने गणाचे समन्वयक योगेश रौदळ (उपसरपंच - भेंडी), मानूर गणाचे समन्वयक नंदू निकम (सरपंच - पाळे), मानूर गणाचे संघटक अरुण बार्डे (सरपंच - कळमथे), बापखेडा गणाचे समन्वयक एकनाथ बागुल (सरपंच - कासुर्डे), बापखेडा गणाचे संघटक कमलाकर बागुल (सरपंच - वेरुळे),

कनाशी गणाचे समन्वयक छबुनाथ कुवर (सरपंच - पळसदर), कनाशी गणाचे संघटक वामन चौधरी (सरपंच - खिराड), अभोणा गणाचे समन्वयक व पत्रकार देवेंद्र ढुमसे (उपसरपंच - वंजारी), अभोणा गणाच्या संघटक कविताताई सीताराम चव्हाण (सरपंच - बोरदैवत), नरुळ गणाचे समन्वयक गणेश गांगुर्डे (सरपंच - कुंडाणे) व नरुळ गणाचे संघटक दीपक खैरनार (उपसरपंच - भुसनी) यांच्यासह कळवण तालुक्यातील सरपंच व उपसरपंच मोठया संख्येने या संसदेसाठी उपस्थित होते.केले.

ग्रामविकासतज्ञ समितीचे समन्वयक श्री.बाजीरावनाना खैरनार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या सरपंच संसदेचे आयोजन करण्यात आले. तालुका सहसमन्वयक व पत्रकार देवेंद्र ढुमसे यांनी आभार मानले. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून सरपंच संसदेस प्रारंभ करण्यात आला तर राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली. ‘एमआयटी - राष्ट्रीय सरपंच संसद’ आणि ’महाराष्ट्र शासन - नाशिक विभागीय आयुक्त विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम टप्प्यात नाशिक प्रशासकीय विभागातील एकूण 54 तालुक्यात ’तालुका सरपंच संसद’ उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.