देवळाली कॅम्प । Deolali Camp (वार्ताहर) :

युनायटेड वी स्टँड फाऊंडेशन या नोंदणीकृत संस्थाच्या माध्यमातून नाशिक तालुक्यातील अतिशय दुर्गम भाग असलेल्या चिमनबारी, रायगडनगर येथील महिलांना शृंगार आणि स्वच्छता या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

युनायटेड व्ही स्टँड फौंडेशन च्या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रात गेल्या 5 ते 6 वर्षांपासून सामाजिकसेवा कार्य केले जात आहे. जागतिक महिला दिनानिमित्त संस्थेने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरविले होते, परंतु कोरोना चे संकट असल्यामुळे मोठ्या स्वरूपात कार्यक्रम करणे शक्य नव्हते.

शृंगार आणि स्वच्छता हे 2 विषय या वर्षी निवडलेले गेले. त्यानुसार शृंगारामध्ये येणारी साडी आणि स्वच्छता मध्ये येणारे सॅनिटरी पॅड या गोष्टी वाटप करण्याचे संस्थेतर्फे ठरविण्यात आले. नाशिक तालुक्यातील रायगडनगर, चिमनबारी हे अति दुर्गम भागातील गावे निश्चित करण्यात आले.

रायगडनगर येथे महिलांना गावातील मंदिरात एकत्र करण्यात आले, कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन व सूत्रसंचालन अडव्होकेट हनी नारायणी यांनी केले. सॅनिटरी पॅड बद्दल जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने डॉक्टर प्रियंका मुटकुळे यांनी मार्गदर्शन केले, इतर महिला सदस्यांनी वाटप आणि विविध प्रशांवर शंका निरसन केले.

महिला दिन असल्यामूळे संपूर्ण कार्यक्रम हा महिला स्वयंसेवकांनी पार पाडले. यावेळी साक्षी फुगे, हर्षाली देवरे, धनश्री बोरसे, महेक पांडे, आकांशा लाकाडे, रश्मी बैरागी, ऐश्वर्या नागरे, देवयानी पाटील आधी सह महाराष्ट्र आदिवासी विकास परिषदचे महाराष्ट्र युवा प्रमुख लकी भाऊ जाधव, रायगडनगर ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व महिला उपस्थित होत्या.