मानलं! गुढीपाडव्याच्या दिवशी सहकुटुंब केले धरणीमातेला वंदन; छायाचित्रांची सर्वत्र चर्चा

मानलं! गुढीपाडव्याच्या दिवशी सहकुटुंब केले धरणीमातेला वंदन; छायाचित्रांची सर्वत्र चर्चा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

मराठी नीन वर्ष आणि गुढीपाडव्याचे जल्लोषात स्वागत सर्वत्र करण्यात आले. आजच्या दिवसातील खूप सारे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले. मात्र, या सर्वांमध्ये भाव खाऊन गेले ते कुटुंबातील फोटो होते.

आजच्या नव्या दिवशी नवी सुरुवात करताना हे शेतकरी कुटुंब धरणीमातेला वंदन करतआहे. हर्षोल्हासात आजच्या दिवसाची सुरुवात त्यांनी केली असू हे फोटो सध्या सोशल मीडियात अधिराज्य गाजवताना दिसत आहेत....

जेव्हा हे छायाचित्रे सोशल मीडियात व्हायरल होताना दिसून आले. हे फोटो होते निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे येथील.

येथील शेतकरी श्याम मोगल यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना म्हटले की, नविन वर्ष.... नविन हर्ष....नविन पालवी....

धरतीमातेस कृतज्ञता भावली, संकल्प विषमुक्त मातीचा अनं अन्नाचाही, धरतीमाते या नव वर्षात तुझी उत्तरोत्तर अशीच सेवा घडू दे... हीच प्रार्थना...

ते मोगल म्हणत असून सहकुटुंब धरणीमातेचे आभार मानत आहेत. पाया पडत आहेत. या फोटोंनी सोशल मीडियात वाहवा मिळवली असून अनेकांच्या स्टेट्सवर ते सध्या चिकटलेले दिसून येत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com