समाजासाठी दातृत्व महत्वाचं - छत्रपती संभाजी राजे भोसले

जीवनगौरव आणि गोदागौरव पुरस्काराचे वितरण
समाजासाठी दातृत्व महत्वाचं - छत्रपती संभाजी राजे भोसले

नाशिक । प्रतिनिधी Nashik

समाजात काही महत्वाच्या संस्था नागरिकांचे सन्मान, सत्कार हे पात्रतेवर करतात. समाजासाठी दातृत्व महत्वाचे असते आणि ज्यांनी असे दातृत्व निभावले त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे आवश्यक आहे.

ज्या समाजात जन्म झाला त्या समाजाला देणं लागतो त्यासाठी पूर्ण ताकदीने ते दातृत्व निभावणं आवश्यक असते, असे प्रतिपादन छत्रपती संभाजीराजे भोसले (Chhatrapati Sambhaji Raje Bhosale) यांनी केले. ते श्री संत गाडगे महाराज नागरी सहकारी पतसंस्था (Shri Sant Gadge Maharaj Nagari Sahakari Patsanstha) आणि श्री राजे छत्रपती सामाजिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा मंडळयांच्या तर्फे देण्यात येणाऱ्या जीवनगौरव आणि गोदागौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात (Godagaurav Award Ceremony) बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर शिवसेना (shiv sena) उपनेते रवींद्र मिर्लेकर (ravidra mirlekar), आमदार सुधीर तांबे (mla sudhir tambe), शीला सरपोतदार, महंत भक्तीचरणदास, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड (datta gaikwad) आणि पुरस्कार वितरण निवड समिती अध्यक्ष मधुकर झेंडे, आयोजक गणेश बर्वे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना छत्रपती संभाजी राजे म्हणाले, माझा सुसंस्कृत घरात जन्म झाला तरी चळवळीचे नेतृत्व गुण आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये एक असामान्य ताकद असते त्या ताकदीच्या जोरावर ते अविस्मरणीय काम करू शकतात. आपली योग्यता आपल्या जन्माने नाही तर आपल्या कर्तृत्वाने होत असते. माझा जन्म जरी शिवरायांच्या वंशात झाला तरी मी जन्मापेक्षा माझ्या कर्तृत्वावर भर देतो. कारण माझे कर्तृत्व काहीच नसेल तर मला काहीच किंमत राहणार नाही. शिवरायांचा रक्ताचा असल्याचा मला अभिमान आहेच पण मी त्यांच्यातील एक गुण जरी माझ्यात आला तरी मी स्वतःला योग्य समजेल.

शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त करताना, मी या व्यासपीठावर छत्रपतींच्या वंशासोबत बसलो हा माझा सन्मान आहे. राजेंनी मराठा आरक्षणाबाबत (Maratha reservation) घेतलेली भूमिका वाखाणण्याजोगी आहे. संत गाडगे महाराज (Sant Gadge Maharaj) हे खरेखुरे संत होते. जन प्रबोधनाचे कार्य त्यांनी केले. या कार्यातून त्यांनी माणसातील देव शोधला. त्यांनी दिलेली शिकवण अशी की, माणसाने नम्र असावे, नम्रपणामध्ये विद्वत्तेपेक्षा मोठी ताकद असल्याचेही त्यांनी यावेळी सांगिटले.

माझं आणि नाशिकचं नातं फार पूर्वीचं

नाशिककर (nashikkar) आणि छत्रपतींचे जुने नातं आहे. महाराज विश्रामगडवर आलेले होते. रामशेज किल्यावर (Ramshej Fort) संभाजी राजे (Sambhaji Raje) आले होते. सत्यशोधक समाजाच्या (Satyashodhak Samaj) चळवळीला चालना देण्यासाठी शाहू महाराज (Shahu Maharaj) नाशिकला आले. त्यांनी देखील भरपूर मदत केली होती. आपल्या पिंपळगाव बसवंतला (Pimpalgaon Baswant) गणवतराव मोरे यांनी सर्वसामान्यांसाठी मंदिर उघडे केले तर त्यांना बेड्या घालून गावात फिरवले होते. शाहू महाराजांनी वकील देऊन त्यांना सोडवले आणि तिथे जाऊन राजवस्त्र दिले होते. त्यामुळे माझं आणि नाशिकचं नातं फार पूर्वीचं आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com