अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले भुजबळ

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले भुजबळ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे आज सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी गेले होते.

दरम्यान दर्शन करून परतत असताना वणी-दिंडोरी रस्त्यावर (Vani-Dindori Road) मालवाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात (Accident) झालेला होता. यामुळे वाहतुकीचीदेखील कोंडी झाली होती.

पालकमंत्री भुजबळांच्या गाड्यांचा ताफा जात असताना त्यांनी आपली वाहने थांबवून त्या ठिकाणी पाहणी करत अपघातग्रस्तांची चौकशी केली. मदतकार्य करत असलेल्या संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत विचारपूस केली. तसेच याठिकाणी सर्व वाहतूक सुरळीत करण्यात मदत केली.

Related Stories

No stories found.