नाशिक | प्रतिनिधी

देशातील प्रत्येक नागरिकाला घटनेने आपले अधिकार आणि कर्तव्य दिले आहेत. राज्यपाल नियुक्त सदस्यांची निवड करणे राज्यपालांचे कर्तव्य आहे. त्यामुळे ते बजावतील अशी अशा व्यक्त करत नाशिकचे पालकमंत्री आणि नागरी व अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली...

ते म्हणाले, राज्यपालांच्या आदेशाने महत्वाचे निर्णय होतात. मंत्रिमंडळाच्या पाठीमागे उभं राहणं हे राज्यपालांचं काम आहे. मंत्रिमंडळाने देखील राज्यपालांचा योग्य तो मान सन्मान ठेवला पाहिजे.

अनेकदा राज्य सरकार वेगळं, केंद्रात सरकार वेगळं असताना राज्यपालांनी नियमांचं पालन केलेलं आहे. महाराष्ट्रातील राजभवन आणि CMO यांच्यात अंतर वाढले आहे.

परंतु राज्यपालांचं कर्तव्य आहे की त्यांनी आमदारांची नियुक्ती करावी. चार महिने झाले असतानाही राज्यपालांनी अद्याप निर्णय न घेणे कितपत योग आहे असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला.