पाणी काटकसरीने वापरा- पालकमंत्री भुजबळ

जानोरी येथे व्यापारी संकुलांचे उद्घाटन
पाणी काटकसरीने वापरा- पालकमंत्री भुजबळ

जानोरी । वार्ताहर Janori

सध्या जिल्ह्यात पावसाचे आगमण लांबलेले आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्याची काटकसर करण्याची गरज असल्याचे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal ) यांनी केले.

जानोरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल व क्रांतिसूर्य महात्मा फुले व्यापारी संकुलाचा लोकार्पण सोहळा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ ( Assembly Vice President Narhari Jhirwal ) यांच्या अध्यक्षतेखाली जानोरी येथे पार पडला. त्याप्रसंगी भुजबळ बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, जि. प. सदस्य भास्कर भगरे, माजी जि. प. सदस्य शंकरराव काठे, प्रविण जाधव, शहाजी सोमवंशी, कामिनी चारोस्कर, योगेश गोसावी, शाम हिरे, तौसिफ मनियार, राजू शिंदे, सुरेश खोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘जानोरी ग्रामपंचायत ही उपक्रमशील ग्रामपंचायत असून नवनवीन उपक्रम राबवून गावाचा विकास साधणारी ग्रामपंचायत म्हणून उल्लेख करावा लागेल, असे गौरवोव्दार काढत जानोरी ग्रामपंचायतीने राबविलेल्या योजना व विकासकामांचा उल्लेख करत ग्रामपंचायतीच्या सर्व कार्यकारिणी मंडळाचे अभिनंदन आहे, असे उद्गार यावेळी भुजबळ यांनी काढले.

ना,भुजबळ पुढे म्हणाले की, गावचा विकास करायचा असेल तर राजकारण न करता गाव विकासासाठी एकत्र आले पाहिजे. मी स्वतः जनतेचा प्रश्न सोडवताना अथवा विकासकामे करताना जात किंवा पक्ष कधीही बघितले नाही. आजही ते तत्व कायम चालू आहे.करोना नियमांच्या पालन करण्याचे आवाहन यावेळी भुजबळ यांनी केले. करोनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्णय घ्यावे लागत असले तरी ते जनतेच्या हितासाठी घेतले जात असून एक जबाबदारी म्हणून नियम करावे लागतात. आपणही त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन भुजबळांनी केले.

सध्या ओबीसी आरक्षण परत मिळवण्यासाठी लढा चालू असून त्यात नक्कीच यश मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य शंकरराव वाघ यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी परिसरातील पाणी, वीज, रस्ता तसेच कर्जवसुलीसंबंधी समस्या सांगितल्या. त्यावर तोडगा काढण्यासाठी विनंती केली.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनीही परिसरातील समस्यांवर नजर देत यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे आश्वासन दिले.

यावेळी प्रांताधिकारी संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, गटविस्तार अधिकारी जिभाऊ शेवाळे, पोलिस उपनिरीक्षक कल्पेश चव्हाण, सचिन नवले, राजेंद्र विधाते, तलाठी किरण भोये,

ग्रामविकास अधिकारी के. के. पवार, सरपंच संगीता सरनाईक, उपसरपंच गणेश तिडके, सदस्य शंकरराव वाघ, विष्णूपंत काठे, दत्तात्रय घुमरे, अशोक केंग, नामदेव डंबाळे, सुभाष नेहरे, दत्तात्रय केंग, ललीता वाघ, कमल विधाते, हिराबाई भोई, सत्यभामा वाघ, मंदा शिंदे, सुनीता बेंडकुळे उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com