नवीन नाशिक । Nashik

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नवीन नाशकातील एका हॉटेल बिअर बारवर अचानक धाड टाकली होती . पालकमंत्री येताच अनेक ग्राहकांनी पळ काढला तर हॉटेल चालकाची चांगलीच धावपळ उडाली होती. दरम्यान दुसऱ्याच दिवशी पोलीस प्रशासनाने कारवाई करत हे हॉटेल सील केले आहे.

रविवारी परिमंडळ २ चे उपायुक्त विजय खरात यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते विभाग ३ यांनी अंबड गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे , गुन्हे शोध पथक व पोलीस अमलदार यांनी मनपा यांच्यासोबत हॉटेल गंगोत्री बार मधील १९ तळीरामावर ५०० रुपये प्रमाणे दंड आकारणी करत सदर गंगोत्री बार हे पुढील आदेशापर्यंत सील केले .

हॉटेल तसेच बार चालकांना शासनाने आखून दिलेल्या नियमानुसार पालन करण्याचे गरजेचे असताना ते होत नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्वतःच नवीन नाशकातील एका हॉटेल बिअर बारवर अचानक धाड टाकली. पालकमंत्री येताच अनेक ग्राहकांनी पळ काढला तर हॉटेल चालकाची चांगलीच धावपळ उडाली.

त्रिमूर्ती चौक ते कामटवाडे रोड वरील हॉटेल व बिअर बार गंगोत्री येथे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास स्वतः धाड केली. यावेळी पोलिसांचा ताफा व पालकमंत्र्यांना पाहून मद्यप्राशन करायला बसलेले ग्राहकांची पळापळ सुरू झाली.

अनेकांनी हॉटेलचे बिल न देताच हॉटेल मधून काढता पळ काढला. तर मंत्री महोदयांच्या प्रश्नांची उत्तरे देताना हॉटेल चालकाची बोबडीच उडाली. पालकमंत्री स्वतः लक्ष देऊन या गंभीर बाबींची दखल घेत असल्याने प्रशासन देखील कामाला लागले आहे.

हॉटेल बार वर होत असलेल्या कारवाई बाबत नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे. यानंतर कुणीही करोनाच्या बाबतीतीत हलगर्जीपणा केला तर कडक कारवाईचा इशारा भुजबळ यांनी दिला आहे.