पालकमंत्र्यांनी बोलावली बैठक; 'हे' आहे कारण

पालकमंत्र्यांनी बोलावली बैठक; 'हे' आहे कारण
छगन भुजबळ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

संपूर्ण राज्यासह जिल्ह्यातही (Nashik District) करोना (Corona) रुग्णसंख्या वाढत असल्याने पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे गुरुवारी (दि.6) जिल्ह्याची आढावा बैठक घेत आहेत. यात निर्बंध अधिक कठोर करण्यासह शाळा (Schools) बंद करण्याचा निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे...

नाशिक जिल्ह्यात दिवसाला 300 करोना रुग्ण आढळत असून पॉझिटिव्हिटी रेट 6.77 टक्क्यांवर पोहोचला आहे. हा दर 10 टक्क्यांवर पोहोचल्यास लॉकडाऊन (Lockdown) सदृश्य निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला (State Government) आहे. राज्य सरकारने स्थानिक स्तरावर हे अधिकार दिल्यामुळे मुंबई (Mumbai), नवी मुंबई पाठोपाठ पुणे (Pune) शहरातील शाळाही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या विचारात घेता याविषयी गुरुवार (दि.६) च्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पालकमंत्री भुजबळांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Suraj Mandhare) यांच्याकडून शाळांची माहिती मागवल्याचे समजते.

तसेच करोना रुग्णांची दैनंदिन स्थितीही घेतली जात आहे. तीन दिवसांपासून सलग 300 पेक्षा अधिक करोनाबाधित रुग्ण आढळल्याने पालकमंत्र्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक बोलवली आहे.

Related Stories

No stories found.