उद्यापासून हमीभावाने मका खरेदी

उद्यापासून हमीभावाने मका खरेदी

पंचाळे । वार्ताहर panchale

हमी भावाने मका खरेदीचा Maize सोमवारी (दि.27) सकाळी 10 वा. तहसीलच्या जुन्या धान्य गोदामामध्ये शुभारंभ होणार आहे. उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन कचरु गंधास, उपाध्यक्ष छबु गंगाधर थोरात व अन्य संचालक यावेळी उपस्थित राहणार आहेत. ‘देशदूत’ने Daily.Deshdoot याबाबतचे वृत्त प्रसिध्द केल्यानंतर खरेदी-विक्री संघाने याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे.

केंद्र शासनाच्या माध्यमातून पणन मंडळाच्यावतीने दरवर्षी हमी भावाने धान व मका खरेदी प्रक्रिया राबवली जाते. यावर्षी शासनाने मक्यास प्रति क्विंटल 1हजार 870 रुपये हमी भाव जाहीर केला आहे. तीन महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यातील आठ केंद्रांवर ऑनलाइन मका नोंदणी सुरू करण्यात आली होती.

यावर्षी विविध कारणांमुळे शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणीकडे पाठ फिरवल्याने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात फक्त साडेचार हजार शेतकर्‍यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. सिन्नर तालुक्यामध्ये Sinnar Taluka 250 शेतकर्‍यांनी मका विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत हे मका खरेदी केंद्र सुरू राहणार आहे.

शेतकर्‍यांनी 14 आद्रता असणारी मका तहसील कार्यालयाशेजारी असणार्‍या पुरवठा शाखेच्या गोडाऊनमधील खरेदी केंद्रावर आणावी, प्रति शेतकरी हेक्टरी 40 क्विंटल मका खरेदी केली जाणार असल्याची माहिती संघाचे व्यवस्थापक संपत चव्हाणके यांनी दिली. खरेदी-विक्री संघाने उशिरा का होईना खरेदी केंद्र सुरू केल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे .

खुल्या बाजारांमध्ये सध्या मक्यास दीड हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे सध्या मका विक्रीतून शेतकर्‍यास प्रतिक्विंटल चारशे ते पाचशे रुपये तोटा होत आहे. हमी भावाने खरेदी सुरु झाल्याने शेतकर्‍यांचा हा तोटा कमी होण्यास हातभार लागणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com