नवीन नाशिक
नवीन नाशिक
नाशिक

नवीन नाशकातील बाधितांचा वाढता आकडा चिंतेचा विषय

संचारबंदीचे नियम धाब्यावर

Gokul Pawar

Gokul Pawar

नवीन नाशिक : सुरुवातीला लॉकडाऊन संदर्भात नियम पाळणारा नवीन नाशकातील कामगार वर्ग नंतर मात्र बेभानपणे नियम धाब्यावर बसवत फिरताना दिसले. यामुळे येथील आजपर्यंतचा बाधितांचा आकडा सुमारे अडीचशे पर्यंत गेल्याने चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे.

सुरूवातीला परजिल्ह्यातून व मालेगावातून येणार्‍यांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली होती आणि नेमके हेच कारण नवीन नाशकातील करोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढण्यास कारणीभूत ठरले. नंतर आरोग्य विभाग व पोलिस यंत्रणेने याकडे लक्ष दिले खरे मात्र नागरिकांचा बेजबाबदारपणा रुग्ण संख्या वाढीस कारणीभूत ठरला.

नवीन नाशिक परिसरात आत्तापर्यंत सुमारे २० कंटेनमेंट झोन तयार झाले होते. यामध्ये गोविंद नगर, साळुंके नगर, पाथर्डी फाटा, शिवशक्ती चौक, सावरकर चौक, साळुंके नगर, खुटवड नगर, अंबड गाव, पाथर्डी फाटा, अनमोल नयनतारा, मोदकेश्वर अपार्टमेंट, संजीव नगर आदी परिसरांचा यामध्ये समावेश होता.

आतापर्यंत सुमारे २४६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी रुग्ण ठीक होण्याची संख्या देखील चांगली असून ३ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. नवीन नाशिक परिसराची एकूण लोकसंख्या तीन ते चार लाखापर्यंत अजून येथे धुळे,जळगाव, नंदुरबार, मालेगाव, कसमादे तसेच परप्रांतातील नागरिकांची मोठी संख्या आहे.

शहरातील पहिला करोना पॉझिटिव्ह रुग्ण याच परिसरातील गोविंद नगर भागात आढळून आला होता. त्यानंतर संजीव नगर भागात एकूण ११ जण पॉझिटि तर शिवशक्ती चौकात एकाच घरातील सात जण आढळून आले होते. मनपाच्या मोरवाडी येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालयातील रुग्णवाहिकेचा वाहनचालकही पॉझिटिव आढळून आला होता.

बहुतांश जण हे मुंबई-पुणे, मालेगाव, दिल्ली या भागातून आल्याचे दिसून येते.

सुरवातीचे काही दिवस लॉकडाऊन चे नियम इमाने-इतबारे पाळण्यात आले. त्यानंतर मात्र सर्रासपणे नियम तोडल्याचे दिसून आले. त्यामुळे नवीन नाशिक चा परिसर सध्या हॉटस्पॉट च्या दिशेने जातो की काय अशी शंका वाटू लागली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com