गट प्रवर्तक, आशा स्वयंसेविक काढणार दिल्लीत मोर्चा

गट प्रवर्तक, आशा स्वयंसेविक काढणार दिल्लीत मोर्चा

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

गटप्रवर्तक (group promoter) व आशा स्वयंसेविकांना (Asha volunteers) शासकीय सेवेत कायम करावे, मोबदला वाढ करावी यासह विविध मागण्यांसाठी

मंगळवार दि. २८ मार्च रोजी गट प्रवर्तक व 'आशा'चा दिल्ली (delhi) येथे आयटक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते (Maharashtra State Health Department) गटप्रवर्तक व आशा संघटना (आयटक)चे राजू देसले यांनी दिली.

याबाबत खा.हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांना देण्यात आलेल्या निवेदनात (memorandum) म्हटले आहे की, गरीब, दुर्लक्षीत, गरजू जनतेला सहज साध्य परवडण्याजोगी कार्यक्षम, उत्तरदायी व विश्वासार्ह आरोग्य सेवा (Health care) पुरविण्यासाठी २००५ साली राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियान (National Rural Health Mission) सुरू केले.

सध्या देशामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये (National Health Mission) सुमारे ८ लक्ष आशा स्वयंसेविका व सुमारे ४० हजार गटप्रवर्तक कार्यरत आहेत. गटप्रवर्तकांना तृतीय श्रेणी देऊन व आशा स्वयंसेविकांना चतुर्थ श्रेणी देऊन कायम कर्मचा- याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी आहे. त्यांना कायम करण्याचा निर्णय घ्यावा. २०१८ पासून गट प्रवर्तक व आशा च्या मोबदल्यात केंद्र सरकारने वाढ झाली नाही.

करोना (corona) योध्याना किमान वेतन देऊन सन्मान करावा. गटप्रवर्तकांना दरमहा रु. २६००० रू. अधिक प्रवास भत्ता द्या व आशा स्वयंसेविकांना दरमहा रू. २४००० देण्याची त्वरित द्या अशी मागणी आयटक सलग्न अखिल भारतीय आशा व गट प्रवर्तक फेडरेशने केली आहे. दि २८मार्च २०२३ रोजी दिल्ली येथे जंतर मंतर येथे देशभरातील आशा व गट प्रवर्तक एकत्र येऊन आंदोलनं (agitation) करणारं आहेत, असेही राजू देसले यांनी म्हटले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com