मालेगाव महानगरपालिका मुख्यालयात समुह राष्ट्रगीत गायन

मालेगाव महानगरपालिका मुख्यालयात समुह राष्ट्रगीत गायन

मालेगाव | प्रतिनिधी ( Malegaon)

मनपा मुख्यालयासह चारही प्रभाग कार्यालय तसेच इतर विभागांच्या कार्यालयांमध्ये आज 17 ऑगस्ट २०२२ रोजी केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानूसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ( Swatantryacha Amrut Mahotsav ) ‘स्वराज्य सप्ताह’ ( Swarajya Saptah)अंतर्गत मनपा.आयुक्त तथा प्रशासक भालचंद्र गोसावी यांचे प्रमुख उपस्थितीत मालेगाव महानगरपालिका मुख्यालयात समुह राष्ट्रगीत गायनाचे आयोजन करण्यात आले.

तसेच मनपाचे सर्व प्रभाग कार्यालये, अग्निशमन विभाग, संकिर्ण कर विभाग, स्वच्छता विभागाचे सर्व हजेरी सेंटर, सर्व दवाखाने, सर्व नागरी आरोग्य केंद्र, जलशुध्दीकरण केंद्र या ठिकाणी सकाळी ११.०० वाजता सामूहिक राष्ट्रगीताचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपायुक्त हेमलता डगळे, सहा.आयुक्त तुषार आहेर, राजू खैरनार, सुनिल खडके, सचिन महाले, आरोग्याधिकारी डॉ सपना ठाकरे, शहर अभियंता कैलास बच्छाव, शासकीय नगररचनाकार विश्वेश्वर देवरे, मनपा नगररचनाकर संजय जाधव, नगरसचिव साजिद अन्सारी, विद्युत अधिक्षक अभिजित पवार, उपअभियंता शांताराम चौरे, जयपाल त्रिभुवन, सचिन माळवाळ,

जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, आस्थापना पर्यवेक्षक तौसीफ शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल दुसाने, डॉ.पंकज शिंपी, शहर प्रकल्प अधिकारी रोहित कन्नोर, अतिक्रमण अधिक्षक शाम कांबळे, उद्यान अधिक्षक निलेश पाटील, वरिष्ठ लिपीक संजय साबळे, अनिल कोठावदे, निलेश जाधव, शैलेश पाटील, दिनेश मोरे, इरफान मो.अश्रफ, हेमंत सावकार,

जयवंत पाटील, रमाकांत धामणे, बाजीराव सोळंकी, बळवंत बाविस्कर, कांताबाई सोनवणे, रूथ शिंदे, जयश्री देशमुख, लिपीक अनिल सांगळे, गजानन बन्नापुरे, किरण सेंगर, कमलेश चौधरी, सचिन पिंगळे, गौरव पवार, आप्पासाहेब आहिरे, ज्योत्सना शेलार, छाया पाटील, मनिषा पाडवी, रत्ना जाधव, मंगला हिरे, निकिता देशमुख, समुह संघटीका संदिप वाघ, बेबीनंदा कासार, कल्पना सोनपसारे तसेच महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी व इतर मनपा कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com