गटविकास अधिकारी महेश पाटील अपघातात बचावले

हॉटेल गोदावरी समोर वाहन पलटी; चालकासह पाटील सुखरूप
गटविकास अधिकारी महेश पाटील अपघातात बचावले

भऊर । प्रतिनिधी

जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत देवळा येथे आयोजित आढावा बैठक संपल्यावर चांदवडकडे जात असलेल्या चांदवड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पाटील यांच्या शासकीय वाहनाला हॉटेल गोदावरी जवळ अपघात झाला. सुदैवाने या अपघातात गटविकास अधिकारी महेश पाटील आणि गाडीचे चालक यांना किरकोळ दुखापत झाली असून ते सुखरूप आहेत.

काल दि. ५ रोजी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत देवळा तहसील कार्यालयात कोरोना परिस्थितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली होती. चांदवडचे गटविकास अधिकारी महेश यांच्याकडे देवळा पंचायत समितीचा अतिरिक्त चार्ज असल्याने ते देखील या बैठकीस उपस्थित होते.

बैठक संपल्यावर ते आपल्या शासकीय वाहनाने चांदवडच्या दिशेने जात असताना, गोदावरी हॉटेलच्या जवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या इर्टीगा गाडीने जोरदार धडक दिल्याने पाटील यांचे वाहन पलटी झाले. वाहन पलटी झाल्याने त्यांना बाहेर पडता येत नसल्याने गाडीच्या काचा फोडून त्यांना बाहेर काढण्यात आले. या अपघात सुदैवाने पाटील व त्यांचे वाहन चालक यांना किरकोळ दुखापत झाली असून ते सुखरूप आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com