व्हॉटसअ‍ॅप द्वारे तक्रार निवारण केेंंद्र

दिंडोरी - पेठ तालुक्यातील नागरिकांसाठी सुविधा
व्हॉटसअ‍ॅप द्वारे तक्रार निवारण केेंंद्र

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

दिंडोरी - पेठ तालुक्याचे प्रांत अधिकारी डॉ.संदिप आहेर यांनी प्रशासन अधिक लोकाभिमुख करीत तलाठीसह इतर महसुलच्या प्रलंबित प्रकरणांंचा निपटारा करण्यासाठी व्हॉटसअ‍ॅपवर तक्रार निवारण केेंंद्र सुरु केले आहे. त्याच्या या उपक्रमाचे दोन्ही तालूक्यातील जनतेने स्वागत केले आहे.

दिंडोरी -पेठ तालुक्यातील अनेक नागरिक तहसील कार्यालय अंतर्गत येणारे सर्व मंडल अधिकारी कार्यालय, सर्व तलांठी कार्यालय या ठिकाणी शासकीय कामासाठी अर्ज करीत असतात. परंतु लवकर अर्जावर विचार होत नाही.

काही वेळेस तांत्रिक बाबी अपुरे असतात तर काही वेळेस अडचणी येतात. त्यावर नागरिकांना हेलपाटेही माराव्या लागतात. त्यामुळे अधिक जलदगतीने प्रशासन व्यवस्था करण्यासाठी दिंडोरीचे प्रांत डॉ.संदिप आहेर यांनी व्हॉटसअ‍ॅप तक्रार निवारण कक्ष ही ऑनलाईन संकल्पना राबविली आहे.

ज्या नागरिकांनी परिपूर्ण अर्ज केलेले आहे, अद्याप त्यावर कार्यवाही झाली नाही अशा प्रकरणावर सद्यस्थिती जाणून घेणे आणि अर्जाचा निपटारा करुन घेणे असा लाभ अर्जदाराला घेता येणार आहे.

तथापि व्हॉटसअ‍ॅप तक्रार निवारण कक्षात ऑनलाईन अर्ज करण्यापुर्वी सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज केल्यानंतर त्या अर्जाबाबत संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी मुदतीत कार्यवाही केली नसेल तर या तक्रार निवारण कक्षात अर्ज करावयाचा आहे.

अर्ज करताना पुर्वी केलेल्या अर्जाची प्रत जोडणे आवश्यक आहे. नवीन प्रकरणाचा अर्ज करता येणार नाही. तक्रार निवारण कक्षाचा क्रमांक 9421550822 असा आहे. या क्रमांकावर दिंडोरी, पेठ तालुक्यातील नागरिक अर्ज करु शकतील. प्रांत अधिकारी डॉ.संदीप आहेर यांनी प्रशासनाला गतीमान करण्यासाठी सुरु केलेल्या या उपक्रमांचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com