स्मृतिदिन संचलन कार्यक्रम : शहीद पोलिसांना अभिवादन

स्मृतिदिन संचलन कार्यक्रम : शहीद पोलिसांना अभिवादन

नाशिक | Nashik

कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना बुधवारी (दि.२१) विशेष पोलीस महानिरीक्षक...

विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शहीद पोलीस स्मृतिदिन संचलन कार्यक्रमात मानवंदना देण्यात आली.

21 ऑक्टोबर हा दिवस देशभरात राष्ट्रीय शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. 1962 मध्ये हॉट स्प्रिंगमध्ये चिनी सैनिकांशी लढताना जे जवान शहीद झाले, त्यांना मानवंदना दिली जाते.

नाशिक विभागासह नाशिक जिल्ह्यातील शहीद पोलीस बांधवांना मानवंदना देण्यासाठी शहर पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर स्मृतिदिन संचलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहीद दिनानिमित्त हुतात्मा स्मारकाची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. यावेळी भारतातील २०६ आणि महाराष्ट्रातील ६ कर्मचार्‍यांना मानवंदना अर्पण करण्यात आली.

पोलीस बँडच्या पथकाने मानवंदना दिल्यानंतर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पोलिसांनी हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडत शहिदांना मानवंदना दिली.

यावेळी विशेष पोलीस महासंचालक डॉ. प्रताप दिघावकर, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com