जिल्ह्यात विविध ठिकाणी डॉ. आंबेडकरांना अभिवादन

जिल्ह्यात विविध ठिकाणी डॉ. आंबेडकरांना अभिवादन

नाशिक | Nashik

१४ एप्रिल विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंतीदिन. राज्यभरात करोनाचा हाहाकार सुरू असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले होते.

आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हाभरात लक्षात घेत आजच्या करोना साधेपणाने जयंतीसाजरी करण्यात येत आहे. घरात राहून, वाचन करून आंबेडकरांना मानवंदना देण्यात येत आहे.

आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपकुलसचिव डॉ. उदयसिंह रावराणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

नाशिक महावितरण मंडळ

महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज बुधवारी (१४ एप्रिल) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी करण्यात आली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

पंचवटी हिरे विद्यालय

आदिवासी सेवा समिती नासिक संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे माध्यमिक विद्यालय, सावता नगर, सिडको शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल इंगळे यांनी आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

मखमलाबाद विद्यालय, मखमलाबाद

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मखमलाबाद येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्राचार्य के.एस.गावले यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.

शक्ती विकास अकॅडमी नाशिक

भारत सरकार युवा कार्यक्रम नेहरू युवा केंद्र सलग्न शक्ती विकास अकॅडमी नाशिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३० व्या जयंती निमित्त संस्थेचे अध्यक्ष मनोहर जगताप यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. प्रत्येक नागरिकाने व युवकांनी भारतीय संविधानाचे वाचन करून भारतीय राज्यघटना समजून घेतली तर खऱ्या अर्थाने बाबासाहेब यांचे विचार समजून त्याना अभिवादन करण्याची संधी मिळेल असा संदेश दिला. यावेळी चिमुकला अथर्व जगताप यानेही बाबासाहेबाना अभिवादन करत संविधानाचे महत्व समजून घेतले.

दिनकर पाटील यांच्याकडून डॉ. आंबेडकर यांना अभिवादन

भारत घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. यावेळी दिनकर पाटील यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. समवेत माजी नगरसेविका लता पाटील व अमोल पाटील उपस्थित होते..

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com