औद्योगिक परिसर हिरवेगार करणार: गवळी

वृक्ष लागवडीसाठी आयमा अग्रेसर
औद्योगिक परिसर हिरवेगार करणार: गवळी

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

अंबड (Ambad) व सातपूर औद्योगिक परिसर (Satpur Industrial Area) हरित व सुंदर ठेवण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल म्हणून

त्या परिसरातील सर्व रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्याचा व त्याचे कायमस्वरूपी जतन करण्याचा संकल्प महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (Maharashtra Industrial Development Corporation) (एमआयडीसी) ने केला असून त्याचे सर्व नियोजनही करण्यात आले आहे, अशी माहिती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी (Information MIDC Regional Officer Nitin Gawli) यांनी दिली.

अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (AMBAD INDUSTRIES AND MANUFACTURERS ASSOCIATION) (आयमा) (AIMA), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (Maharashtra Industrial Development Corporation) व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने अंबड औद्योगिक वसाहतीतील आयमाच्या रिक्रिएशन सेंटर, आयमा हाऊस, सेंट्रल वेअर हाऊस पांचाळ इंजिनिअर्स (Central Warehouse Panchal Engineers) येथील व ट्रंम्फ इंजिनिअरिंग (Trump Engineering) परिसरात मान्यवरांच्या हस्ते मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण (tree plantation) करण्यात आले.

के. आर. बूब सभागृहात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना गवळी बोलत होते. व्यासपीठावर आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, सरचिटणीस ललित बूब, कार्यकारी अभियंता जयवंत बोरसे, आयमा उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, सुदर्शन डोंगरे, योगिता आहेर, वृक्षलागवड समिती चेअरमन दिलीप वाघ आदी होते. यावेळी आयामांचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी वृक्षलागवाडीचे महत्व विशद केले.

करोनाच्या काळात ऑक्सिजनची कमतरता भासली त्यावेळी सर्वानाच झाडांचे महत्व पटले याची आठवण करून देत अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीत दरवर्षी मोठ्याप्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आयमा सक्रिय पुढाकार घेते, असे पांचाळ यांनी नमूद केले. यावेळी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता जयवंत बोरसे यांनी सर्व नियमांचे पालन व अभ्यास करून व चांगल्या प्रतीची झाडे अंबड व सातपूर औद्योगिक परिसरात लावण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास माजी अध्यक्ष जे. आर. वाघ, ज्ञानेश्वर गोपाळे, सचिव गोविंद झा, खजिनदार राजेंद्र कोठावदे, हर्षद बेळे, संजय महाजन, विनीत पोळ, अविनाश मराठे, जगदीश पाटील, राहुल गांगुर्डे, देवेंद्र राणे, जयंत पगार, रवींद्र झोपे, कुंदन डरंगे, देवेंद्र विभुते, अजय यादव, राजा स्वामी गोस्वामी, महेश उदावंत आदीसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रीन अंबड - क्लीन अंबडची माहितीही घेण्यासोबतच ग्लोबल वार्मिंगचा धोका ओळखून प्रत्येकाने पर्यायावरण संवर्धनासाठी पुढे आले पाहिजे आणि किमान एक झाड लावून ते जगविण्याचा संकल्प करावा.

-निखिल पांचाळ, अध्यक्ष आयमा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com