१७३ कोटी रुपयांच्या विकास कामांना हिरवा कंदील

१७३ कोटी रुपयांच्या विकास कामांना हिरवा कंदील

ओझे l विलास ढाकणे Oze

महाविकास आघाडी सरकार चे काळातील दिंडोरी - पेठ विधानसभा मतदारसंघातील विविध प्रस्तावित कामांची स्थगिती अखेर अजित पवार उपमुख्यमंत्री होताच उठली असून त्यासोबतच काही नव्याने विकासकामांना प्रशासकीय मंजुरी मिळत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे पाठपुराव्याने मतदार संघातील 173 कोटींच्या विकासकामांना सरकारने हिरवा कंदील दिला आहे. यापूर्वी मंजूर असलेल्या मात्र निधी अभावी रखडलेल्या कामांना निधी तरतूद तसेच नवीन ही प्रस्तावित कामांना लवकरच मंजुरी मिळण्याचा विश्वास विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडी सरकार काळात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पाठपुरावा करत विविध रस्ते पुल आदी विकासकामे प्रस्तावित केले होते परंतु सरकार बदल होताच बहुतांश कामांना स्थगिती देण्यात आली होती तसेच टेंडर प्रक्रिया पूर्ण होवून सुरू झालेल्या कामांनाही निधी तरतूद न झाल्याने अनेक रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत प्रलंबित होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार,आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचेकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

गेल्या पंधरवड्यात राजकीय घडामोडी होत अजित पवार यांचेसह एक गट सरकार मध्ये सामील होत अजित पवार उपमुख्यमंत्री झाले विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी प्रस्तावित कामांची स्थगिती उठवणे,प्रलंबित कामांना निधी उपलब्धता व नव्याने विकासकामे होण्यासाठी,रद्द झालेल्या वळण योजना होनेसाठी अजित पवार यांचे सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.यानंतर झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत 36.40 कोटींच्या चिमण पाडा वळण योजनेच्या कामास मान्यता देण्यात आली होती. त्यापाठोपाठ नुकतेच दिंडोरी व पेठ तालुक्यातील सुमारे 173 कोटींच्या विविध रस्ते रस्ते पूल आदी विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. विकासकामांना मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित आदी मंत्र्यांचे आभार मानण्यात आले आहे.

1)चिमण पाडा वळण योजनेस मंजूरी

दिंडोरी पेठ सुरगाणा तालुक्याचे घाटमाथ्यावरील नार पार खोऱ्यात पश्चिमेकडे समुद्राकडे वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोऱ्यात वळविण्याचे मांजरपाडा सह बारा वळण योजनांचा पाठपुरावा नरहरी झिरवाळ यांनी केला होता त्यातील मांजरपाडा व इतर सात योजना पूर्ण झाल्या परंतु पाच योजना रद्द झाल्या होत्या त्या पुन्हा सुरू करण्याचा झिरवाळ यांचा पाठपुरावा सुरू होता अजित पवार सरकार मध्ये सामील होताच पहिल्याच मंत्री मंडळ बैठकीत चिमण पाडा वळण योजनेस सुधारित प्रशासाकिय मान्यता मिळाली आहे.सदर योजनेसाठी 36.40 कोटीची निधी तरतूद करण्यात आली आहे. चिमणपाडा परिसरात पडणारे पावसाचे पाणी एकत्र होत ज्या दोन नाल्यांचा उगम होवून पाणी नार पार च्या खोऱ्यात जात समुद्राकडे वाहून जाते ते अडवले जाणार आहे दोन्ही नाल्यांवर बांध घालत सदर पाणी पूर्वेला वळवले जावून ते गोदावरी खोऱ्यातील कादवा नदी द्वारे करंजवन धरणात येणार आहे. सुमारे 45 दशलक्ष घण फूट अतिरिक्त पाणी या योजने मुळे मिळणार आहे .

2)दिंडोरी पिंपळगाव रस्त्याला दर्जा उन्नती राज्यमार्ग होणार भरघोस निधी चे कामास मंजुरी

दिंडोरी व पिंपळगाव बाजार समितीला जोडणारा अत्यंत महत्वाचा दिंडोरी पालखेड जोपुळ पिंपळगाव हा जिल्हा मार्ग होता त्याची दर्जा उन्नती करत सदर रस्ता राज्य मार्ग 29 झाला असून सदर रस्त्याचे मजबुती करण नूतनीकरण साठी सुमारे 17 कोटींच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे तूर्तास खड्डे भरत डागडुजी करत पावसाळा संपताच काम सुरू होणार आहे.

3)खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार

पावसाळ्यापूर्वी काही रस्त्यांची कामे झाली मात्र त्यातील काही रस्ते खराब झाले आहे सदर रस्त्यांची पावसाळा संपताच पक्की दुरुस्ती करून घेण्याचे आदेश बांधकाम विभागास देण्यात आले आहे.

4)पावसाळा संपताच रस्त्यांची कामे सुरू होणार

यापूर्वी मंजूर मात्र निधी अभावी तसेच पावसाळा सुरू झाल्याने बंद झालेले रस्त्यांची कामे तसेच नव्याने मंजूर झालेली सर्व कामांची लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करत पावसाळा संपताच सर्व कामे सुरू केले जातील असे सांगण्यात आले आहे .

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com