वन्यजीव उपचार केंद्राला हिरवा कंदिल
नाशिक

वन्यजीव उपचार केंद्राला हिरवा कंदिल

नाशिक वनवृत्तातील वन्यप्राण्यांना मिळणार जीवदान

Abhay Puntambekar

नाशिक। प्रतिनिधी Nashik

अपघात अगर इतर काही कारणांनी जखमी झालेल्या वन्यप्राण्यांना तात्काळ उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नाशिकसहर राज्यातील १० वन्यजीव उपचार केंद्र (ट्रान्सीट ट्रीटमेंट सेंटर) सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदिल दिला आहे.

राज्य वन्यजीव मंडळाच्याबैठकीत या उपचार केंद्रांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व वनमंत्री संजय राठोड यांनी तत्काळ निधी उपलब्ध करून देण्याचे सुतोवाच केले आहेत. मागील 4 वर्षांपासून यासाठी नाशिक पश्चिम वनविभागाकडून प्रयत्न केले जात होते.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा असून बिबट्या, हरणे, मोर, कोल्हे, लांडगे यासह विविध वन्य जिवांचे प्रमाण मोठे आहे. परंतु वनक्षेत्रातून जाणारे महामार्ग, रेल्वे यामुळे रस्ते अपघात, रेल्वे अपघात, विहिरीत पडून, कुत्र्यांचे हल्ले तसेच विविध आजारांमुळे वन्यजीव गंभीर जखमी होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण काही वर्षांपासून वाढले आहे.

नाशिक वनविभागाचे उपचार केंद्र नसल्याने ऐनवेळी जखमी किंवा मरणासन्न अवस्थेतील वन्यजीवांना अत्याधुनिक उपचारांसाठी बोरिवली, पुणे, औरंगाबाद येथील केंद्रांमध्ये पाठवावे लागत आहे. अन्यथा इतर पशुवैदकीय अधिकार्‍यांकडून उपचार केले जात होते. परंतु अधिकारी उपलब्ध होत नसल्याने यामध्ये सातत्य नव्हते. परिणामी वन्यजीवांचा मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यामुळे वन्यजीव तसेच प्राणीप्रेमींकडून सातत्याने याचा पाठपुरावा होत होता. तर नाशिक वनविभागाकडून यासाठीचा प्रस्ताव पाठवण्यात आले होते.

मागील 4 वर्षांपासून यासाठी नाशिक पश्चिम वनविभागाकडून प्रयत्न केले जात असून वारंवार या प्रस्तावात मनागपूरफ येथील मुख्य कार्यालयातून त्रुटी काढल्या जात असल्याने अद्याप मंजुरी मिळू शकलेली नव्हती. राज्मातील अकरा वनवृत्तात वन्मजीव उपचार केंद्रास मान्मता देत निधी उपलब्ध करुन देण्माचे आदेश ठाकरे मांनी मंडळाच्मा बैठकीत दिले आहे. त्मात नाशिकचाही समावेश आहे. मामुळे पुन्हा एकदा नाशिककर वन्मजीवप्रेमींच्मा आशा पल्लवित झाल्मा आहेत.

सव्वा ते दीड कोटींचा हा प्रस्ताव असून काही किरकोळ त्रुटींमुळे रखडलेला आहे. वरिष्ठ वनाधिकार्‍यांनी पुणे येथील केंद्रांना भेटी देत दोन महिन्यांपूर्वी पुन्हा नव्याने प्रस्ताव तयार करून नागपूर मुख्य वन कार्यालयाला पाठविला आहे. यास मंजुरी मिळून लवकरच वन्यजीव उपचार केंद्राचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

विवेक भदाणे, वनक्षेत्रपाल, पश्चिम विभाग

असे असेल केंद्र

गंगापुररोड परिसरातील रोपवाटिकेच्या स्थलांतरीत जागेत वन्यजीव उपचार केंद्र उभारण्यासाठी पश्चिम वन विभाग प्रस्ताव आहे. या ठिकाणी वन्यजीवांच्या उपचारांसाठी कायमस्वरूपी वन्यजीव वैदकीय अधिकारी, काळजीवाहनक कर्मचारी उपलब्ध असणार आहेत. अधुनिक यंत्र सामग्री, तसेच शस्त्रक्रियागृह, अतिदक्षता विभाग, औषध भंडार असणार आहे. जखमी वन्यप्राण्यांना ठेवण्यासाठी तसेच त्यांच्या देखभालीसाठी विशिष्ठ प्रकारचे पिंजरे असणार आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com