विशेष गाडीला हिरवा झेंडा

विशेष गाडीला हिरवा झेंडा

मनमाड । प्रतिनिधी Manmad

करोनामुळे दोन वर्ष बंद असलेल्या मनमाड-सीएसटी गोदावरी एक्स्प्रेसला (Manmad-CST Godavari Express )विशेष रेल्वे ( Special Train) म्हणून सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर ही गाडी सुरु झाली आहे.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आ. सुहास कांदे यांनी मनमाड रेल्वेस्थानकावर तर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ऑनलाईन हिरवा झेंडा दाखविल्यानंतर ही गाडी मुंबईकडे रवाना झाली. ना.डॉ. पवार यांनी तिकीट खिडकीवर जावून तिकीट काढत साधारण डब्यातून मनमाड ते नाशिकरोड प्रवास केला. यावेळी त्यांनी प्रवाशांशी संवाद साधून समस्या व अडचणी जाणून घेतल्या.

विशेष गाडीच्या नावाने का होईना अखेर गोदावरी एक्स्प्रेस सुरु झाल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसह दररोज अप-डाऊन करणार्‍या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.ही गाडी प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यासाठी सुरु करण्यात आली असली तरी ती कायमस्वरूपी सुरु राहण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार आहे.

मात्र रेल्वेला गाडी सुरु ठेवण्यासाठी अपेक्षित उत्पन्न मिळण्या सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन ना.डॉ. पवार यांनी यावेळी केले. रेल्वेस्थानकावर आयोजित कार्यक्रमात ना.डॉ. पवार व रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे मनोगत व्यक्त केले. यावेळी भुसावळ विभागासह रेल्वेचे स्थानिक अधिकारी, कर्मचारी, भाजप, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, ना.डॉ. पवार यांचे मनमाड शहरात आगमन होताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून त्यांचे स्वागत केले.

Related Stories

No stories found.