सातपूर l Satpur (प्रतिनिधी)

इएसआयसी या रुग्णालयातून आणखी सक्षम सेवा देण्याच्या दृष्टीने उपाय योजना करता येणे शक्य असून, त्यातही सूधारणा होईल लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी एकत्र काम केल्यास मोठे काम उभे करणे शक्य असल्याचा विश्वास आ. सिमा हिरे यांनी इएसआयसी अधिकारी व कर्मचार्यांशी संवाद साधताना व्यक्त केला. आमदार सिमा हिरे यांनी मागिल वर्षी रुग्णालयाला भेट देऊन पहाणी केली होती. त्यावेळी पून्हा येण्याचे आश्वासन दिले होते.

त्यानुसार कोविड नंतरच्या काळात पून्हा भेट देऊन त्यांनी पहाणी केली व अधिकारी व कर्मचार्यांशी संवाद साधला. यावेळी पूर्णवेळ वैद्यकिय अधिक्षक म्हणून डॉ. राजश्री पाटील यांची निवड झाल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच इएसआयसी केंद्र व राज्याच्या जोखडातून बाहेर येत सोसायटीच्या रुपाने कार्य करीत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

सोसायटी स्थापनेनंतर इएसआयसीच्या कामाला व विकासाला गती मिळालेली आहे. फेब्रुवारीतील भेटीनंतर आज मोठे बदल दिसून येत आहेत. तरी अद्याप अद्यायावत साधनांची गरज दिसून येत आहे.

यावेळी त्यांनी इएसआयसी रुग्णालयात आपेक्षित काही प्रणालीवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना देताना सोसायटीच्या माध्यमातून यावर काम करण्याचे सांगितले. त्यात प्रामुख्याने एक्स रे प्रणाली अद्यायावत करणे, सोनोग्राफीसाठी अतिरिक्त यंत्र हे, अद्यायावत शस्त्रक्रिया कक्ष करणे, अद्यायावत साधनांची उपलब्धता करण्यासाठी केंद्राकडे साकडे घालणार असल्याचे सांगितले.

यावेळी रामहरी संभेराव भगवान काकड, वैभव महाले, आर.आर. पाटील, ंसंगिता शेळके, प्रकाश चकोर, रश्मी बेंडाळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.