पत्रकारांच्या लेखणीत खूप मोठी ताकद : दिघावकर

पत्रकारांच्या लेखणीत खूप मोठी ताकद : दिघावकर

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

जोपर्यंत शेतकरी सुखी होत नाही तोपर्यंत देश महासत्ता होऊ शकत नाही. त्यामुळे पत्रकारांनी शेतकर्‍यांचे प्रश्न प्रामुख्याने हाताळावे, अशी अपेक्षा विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी येथे बोलतांना व्यक्त केली.

श्रीक्षेत्र नस्तनपूर येथे महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने आपल्या लिखाणाच्या माध्यमातून, समाजाच्या जडणघडणीसाठी महत्वाचे योगदान देत सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणार्‍या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना दिघावकर बोलत होते.

पत्रकार आणि पोलीस यांची रास व कार्यही एकच आहे.त्यामुळे पोलीस आणि पत्रकारांच्या समन्वयातून सामान्य जनतेच्या प्रश्न सुटले पाहिजे. पत्रकारांच्या लेखणीत खूप मोठी ताकद असून शेतकर्‍यांचे घामाचे पैसे बुडवाल तर गाठ माझ्याशी आहे हा मथळा वृत्तपत्रांतून छापून येताच शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपये व्यापार्‍यांनी घरपोच केल्याचे दिघावकर यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, मनमाड उपअधीक्षक समरसिंग साळवे, मानवाधिकार आयोगाचे डॉ. संतोष बजाज, अशोक छाबडीया, महंत योगी भूषणनाथ महाराज, प्रकाश वांजोळे, नगराध्यक्ष राजेश कवडे, राजेंद्र पवार, उपसभापती अर्चना वाघ, ज्येष्ट पत्रकार अशोक परदेशी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी बळवंत आव्हाड व भास्कर कदम यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्ह्यातील पत्रकारांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने यावेळी गौरवण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com