के के वाघ
के के वाघ
नाशिक

शेती क्षेत्रात आधुनिकीरणास मोठी संधी : डाॅ. प्रकाश अतकरे

संयुक्त पुण्यतिथी सोहळ्यात प्रतिपादन

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक | Nashik

जो पर्यंत आपण अल्पभूधारक शेतकऱ्यांचा विकास करत नाही तो पर्यंत कृषी क्षेत्राचा विकास होणार नाही. अद्याप शेती क्षेत्रात आधुनिककरण करण्याची मोठी संधी आहे. असे मत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या सहयोग व उपक्रम केंद्राचे डाॅ. प्रकाश अतकरे यांनी मांडले.

के. के. वाघ शिक्षण संस्थेतर्फे पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ, कै.काकुशेठ उदेशी व कै.माधवराव बोरस्ते यांच्या संयुक्त पुण्यसमरण सोहळ्याच्या समोरप प्रसंगी 'कृषी आणि शिक्षण' या विषयावर ते बोलत होते.

डाँ. आतकरे म्हणाले, गेल्या काही दशकात भारत देशाने विविध क्षेत्रात मोठी प्रगती जरी केली असली, तरी हीच प्रगती शिक्षण क्षेत्रात राखण्यास भारत अपयशी आले आहे. त्याचेच प्रमाण म्हणून जगातल्या पहिल्या 100 विद्यापीठात भारतातील एखाद-दुसरे विद्यापीठ दिसते. त्यामुळे भविष्यात भारतीय शिक्षणात मोठा आमूलाग्र बदल आणावा लागेल.

सप्ताहभर पडलेल्या संयुक्त पुण्यस्मरण सोहळ्यास पाच हजारहून अधिक विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी आदींनी ऑनलाईन हजेरी लावली. (दि. २५) जुलै रोजी रोड कनेक्टिव्हिटी याविषयावर दिलीप पाटील आणि तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रकाश कडवे हे मार्गदर्शन केले.

भारत हा शेतीप्रधान देश आहे. मात्र, गेल्या काही दशकात आपण कृषी क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यात कमी पडलो. पण आगामी काळात कृषी क्षेत्रात भरारी घेण्यासाठी कृषी शिक्षणाची आवश्यकता असल्याचे परखड मत डॉ.व्ही एम सेवलीकर यांनी मांडले. कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या प्रयत्नातून नाशिक जिल्ह्यात बांधलेलं बंधारे आणि स्थापन केलेली कृषी व कृषी संलग्न महाविद्यालय यातून जिल्ह्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत तरुण शेतकरी फळबागांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करत आहे. असेही सेवलीकर म्हणाले.

Deshdoot
www.deshdoot.com