खेडगाव । वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी बाळासाहेब बाबुराब ठुबे यांनी द्राक्ष बागेत नुवान हे किटकनाशक प्राशन करून जीवन यात्रा संपवली

शेतकरी ठुबे यांची पत्नी घरी आल्या असता त्यांचा मोबाईल व डायरी घरात दिसली म्हणून त्या आवाज देत देत समोर असलेल्या बागेत गेले असता तेथे बेशुद्ध अवस्थेत दिसले असता शेजारच्या नागरिकांनी तात्काळ पिंपळगाव येथील खाजगी दवाखान्यात नेले उपचारा दरम्यान मध्यरात्री 2 वाजेच्या दरम्यान त्यांची प्राण ज्योत मावळली.

द्राक्षाचे भाव कमी असल्याने लोकांकडून घेतलेले पैसे कसे परत करायचे ह्याही विवनचनेत ते होते .त्यात काल झालेला अवकाळी पावसाने चिंतेत वाढ झाली मागील तीन ते चार दिवसापासून त्यांच्या शिवारातील डीपी ही बंद केली असून ते वीज बिल द्राक्ष बागेचा खुडा बाकी असल्याने थकबाकी भरण्याची परिस्थिती नसल्या कारणाने ते विचारात होते.

त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगी व पत्नी असा छोटा परिवार आहे सदर सध्या वीज मंडळाने सुरू केलेली वीज थकबाकी वसुली मोहीम त्वरित थांबवावी व द्राक्ष दर ह्या वर्षी कमी उत्पादन असतानाही का पडले ह्याचीही चौकशी व्हावी अशी मागणी खेडगाव परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.