द्राक्ष खरड छाटणीस सुरुवात

द्राक्ष खरड छाटणीस सुरुवात

पालखेड बं. । वार्ताहर | Plakhed

दिंडोरी तालुक्यात (dindori taluka) गेल्या काही दिवसांपासून द्राक्ष (Grapes) पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या तालुक्यात सध्या द्राक्षाच्या एप्रिल तथा खरड छाटणीला सुरुवात झाली आहे.

द्राक्ष काढणी अंतिम टप्प्यात आल्यामुळे याशिवाय एप्रिल मध्ये पाटाला पाणी सुटलेले असते. त्यामुळे खरड छाटणी लवकर उरकून घेण्यासाठी द्राक्ष उत्पादक (Grape growers) शेतकरी (farmers) प्रयत्न करतात. याशिवाय गहू काढणे कांदा (onion) काढणे ही कामे ही सुरू असल्याने शेतकर्‍यांना मजुरांची टंचाई (Labor shortage) भासत आहे. मागील दोन वर्षांच्या कालखंडाकडे दृष्टिक्षेप टाकला असता करोना (corona) या पार्श्वभूमीवर द्राक्ष पिकाला जरी जेमतेम भाव मिळाला असला तरी या वर्षीदेखील बाजारभावावर करोनाचे पडसाद उमटले.

द्राक्षाला योग्य भाव न मिळाल्यामुळे हा हंगाम देखील काहीसं नरम-गरम गेला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आपले लक्ष भाजीपाला पिकाकडे (Vegetable crop) केंद्रित केले. यावर्षी खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मध्यंतरी झालेल्या अवकाळीने शेतकर्‍यांचे अनेक ठिकाणी नुकसान केले शेतकर्‍यांनी अहोरात्र कष्ट करून या द्राक्ष बागा मुलाप्रमाणे जपल्या होत्या. यावर्षी तरी द्राक्षला बाजार भाव मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु या वर्षीही सुरुवातीला शेतकर्‍यांना बाजार भाव न मिळाल्याने अनेक ठिकाणी द्राक्ष बागा तोडण्यात आल्या.

काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने द्राक्ष बागांची मोठ्या प्रमाणात हानी होऊन या द्राक्ष बागांना तडे गेले. बदलत्या हवामानामुळे तसेच थंडीमुळे (cold wether) सुरुवातीच्या द्राक्ष बागांना याचा मोठा फटका बसला व्यापार्‍यांनी हेच निमित्त साधून शेतकर्‍याचे द्राक्ष कमी भावाने खरेदी केली. बाजारभावातील चढ-उतार व्यापारी वर्गाची पलायन त्यामुळे द्राक्ष पीक बेभरवशाचे झाले आहे. दरवर्षी द्राक्ष हंगामासाठी पेठ (peth), सुरगाणा (surgana) परिसरातून मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग आणले जातात. द्राक्ष काढणी पर्यंत मजुरांची गरज भासते.

त्यातच मागील वर्षी खरड छाटणी उशिरा झाल्यामुळे द्राक्ष वेलीवर माल काड्या परिपक्व न झाल्याने त्याचा फटका काही शेतकर्‍यांना नक्कीच बसला असून द्राक्षवेली सशक्त होण्यासाठी तसेच द्राक्षाच्या खरड छाटणीनंतर द्राक्षवेली मधून परिपक्व गड निघण्यासाठी खरड छाटणीचा अवलंब केला जातो. यावर्षी द्राक्षाची ऑक्टोबर छाटणी ची पहिल्या व दुसर्‍या टप्प्यात मोठ्या प्रमाणात झाली असून अंतिम टप्प्यातील द्राक्षबागांना योग्य भाव मिळाला त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये ‘कभी खुशी कभी गम’ असे चित्र पाहावयास मिळत आहे.

Related Stories

No stories found.