ढगाळ हवामानामुळे द्राक्ष उत्पादक चिंतित

ढगाळ हवामानामुळे द्राक्ष उत्पादक चिंतित

शिरवाडे वणी । वार्ताहर Shirvade Vani

सध्या सुरू असलेल्या ढगाळ हवामानाबरोबरच cloudy weather हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविल्याने द्राक्ष उत्पादक Grapes Growers शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. दिवसागणिक बदलते हवामान आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतीमालाचे नुकसान वाढत चालले आहे. शेतकरी पीक उत्पादनासाठी मोठा खर्च करतो. त्या तुलनेत उत्पादन निघत नसल्याने शेतकर्‍याला कुटुंबाचा गाडा चालविणे अवघड झाले आहे. तालुक्यात नगदी पिकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र हीच पीके आता निसर्गाच्या लहरीपणाला बळी पडू लागली आहे.

मागील चार वर्षातील सरासरी पीक उत्पादनावर दृष्टिक्षेप टाकला असता उत्पादन खर्चही फिटणे अवघड झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच अनेक शेतकर्‍यांनी सोसायटी, बँक, पतसंस्था सोनेतारण, जमीन गहाण, हात उसने पैसे, वीज बिलांची वसुली, किराणा मालाचे वाढते बाजार भाव, वाढीव मजुरीचे दर, खतांचे अवाजवी दर व दैनंदिन गरजा आदी हिशोब धरता शेतकर्‍याच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढतच असल्याचे दिसत आहे.

त्यामुळे शेतकर्‍याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शासनाकडून शेतीव्यवसायाला गतवैभव प्राप्त होण्याकरता आर्थिक बळ मिळणे महत्त्वाचे आहे. परंतु महागाईचा आगडोंब बहुतांशी शेतकर्‍यांच्या माथी पडतांना दिसत आहे. शेतकरी अशा धोरणांना बळी पडतांना दिसत आहे. तसेच शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी अधिकाधिक आर्थिक संकटात जातांना दिसत आहे. तालुक्यातील शेतकरी काबाडकष्ट करून पावसाच्या अंदाजानुसार शेतीची मशागत करतो. शेती पिकाला वेळच्यावेळी खते, औषधे, बी-बियाणे या सर्व गोष्टी पुरवून देखील त्या मानाने उत्पन्न मिळत नसल्यामुळे कर्जबाजारीपणाला सामोरे जावे लागत आहे.

मागील महिन्यात सलग दोन दिवस दोन रात्र पाऊस झाल्याचा परिणाम शेतकरी वर्गाला अद्यापही भोगावा लागत आहे. मागील जखमा अजून ओल्या असतानाच गेल्या चार ते पाच दिवसांपासून सतत ढगाळ हवामान, ठिकठिकाणी पाऊस व बर्फ पडल्यामुळे झालेल्या नुकसानी समोर दिसत आहे. सध्याच्या स्थितीत परिसरात सप्टेंबर महिन्यात छाटणी झालेल्या द्राक्षबागा पाणी उतरण्याच्या अवस्थेत असून ढगाळ हवामान तसेच पाऊस झाल्यास मण्यांवर तडे जाण्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून वर्तविली जात आहे. तसेच ढगाळ हवामानामुळे डाऊनी, भुरी, चिकटा यांचा प्रादूर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे द्राक्षाचे खर्चात आणखीनच दिवसेंदिवस भर पडत आहे. तसेच वीजवितरण कंपनीच्या भारनियमनाचा देखील शेतकरी वर्गाला वेळोवेळी फटका बसत आहे.

शेती व्यवस्था हा पूर्णतः निसर्गावरच अवलंबून असून निसर्गाने साथ दिली तर मातीत कमावण्याची ताकद शेतकरी वर्गात आहे. परंतु निसर्गाचा प्रकोप अव्याहतपणे सुरूच राहिला तर मातीत पिकविलेल्या मालाची माती होण्यास वेळ लागत नाही याचा अनुभव देखील शेतकरी वर्गाला वेळोवेळी आला आहे. दिवसेंदिवस शेतकर्‍यांची दुर्दशा होत असून ही दुर्दशा संपून शेतकरी वर्गाला अच्छे दिन कधी येणार असा सवाल शेतकरी वर्गाला पुढे निर्माण होत आहे. तसेच कृषी क्षेत्रातील अडचणी शेतकरी आणि शेती व्यवसायाला आव्हान देणार्‍या ठरत आहे. परिणामी गेल्या चार ते पाच दिवसांपासून सततच्या ढगाळ हवामानामुळे तसेच हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकर्‍यांचे धाबे दणाणले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com