नाशिकचे द्राक्ष उत्पादक पुन्हा धास्तावले; 'हे' आहे कारण

नाशिकचे द्राक्ष उत्पादक पुन्हा धास्तावले; 'हे' आहे कारण

ओझे | वार्ताहर | Oze

दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) ढगाळ वातावरण तयार होत आहे. तसेच थोड्याफार प्रमाणात पाऊस (Rain) पडल्याने दिंडोरीच्या द्राक्ष पंढरीला खर्चाचे प्रमाण वाढण्याचे चिन्हे दिसू लागले आहे...

गेल्या पाच दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला असून सर्वत्र ढगाळ वातावरण दिसत आहे. पावसांच्या हलक्या सरी अनेक ठिकाणी पडल्यामुळे द्राक्ष पंढरी हादरली आहे.

या वातावरणाचा द्राक्ष (Grapes) पिकावर लवकर परिणाम होत असल्याने बळीराजाची (Farmers) द्राक्ष बागा वाचवण्यासाठी पावडर फवारणीची धावपळ सुरू झाली आहे. त्यामुळे बळीराजावर पुन्हा एकदा आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी सामोरे जाण्याची चित्र निर्माण झाले आहे.

सध्या जवळपास ६० टक्के द्राक्षबागा दोडा व फ्लॉवरिंग अवस्थेत आहे. तर काही बागा मध्यम स्थितीत आहेत. तालुक्यातील जवळपास सर्वच द्राक्षबागांची छाटणी झाली असून ५० टक्क्यांवर खर्च झालेला आहे.

शेतकरी द्राक्षबागा वाचविण्यासाठी तर्वरची कसरत करताना दिसत आहे. शेतकरी वर्गाने आता महागड्या किंमतीच्या पावडरी खरेदी करण्यावर भर दिला आहे. अगोदरच प्रमाणापेक्षा जास्त भांडवल खर्च करून द्राक्षबागा वाचविल्या आणि आता द्राक्षबागा जोमात असताना अचानक वातावरणातील बदल झाल्याने द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त झाले आहेत. अशीच परिस्थिती राहीली तर पुढे काय होईल? असा सवाल उभा राहिला आहे.

मागील हंगामात करोनामुळे (Corona) कटू अनुभव आलेल्या बळीराजाचे अगोदरच भांडवल मोठ्या प्रमाणावर खर्च झाले आहे. आता पुन्हा एकदा वातावरणात अचानक बदल (Climate change) झाल्याने बळीराजावर आर्थिक संकटाची समस्या उद्भवली आहे. त्यामुळे मागील वर्षाची पुनरावृत्ती होऊ नये, अशी भीती तालुक्यातील शेतकरी वर्गाला वाटू लागली आहे.

अगोदर पोषक वातावरण व नंतर हवामानात अचानक बदल झाल्याने बळीराजा हादरला आहे. पावसामुळे द्राक्ष बागांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून महागड्या पावडरी खरेदी करून बागा वाचवण्यासाठी शेतकरीवर्गाची धावपळ सुरु आहे. बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. हवामानातील बदल द्राक्ष पिकांसाठी घातक असून शेतकरी वर्ग पुन्हा आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे निर्माण झाले आहे.

कैलास कांगणे, द्राक्ष उत्पादक, नळवाडी.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com