परतीच्या पावसाने द्राक्ष उत्पादकांवर अस्मानी संकट

परतीच्या पावसाने द्राक्ष उत्पादकांवर अस्मानी संकट

पालखेड मिरचिचे | वार्ताहर | Palkhed Mirchiche

तालुक्याच्या उत्तर भागातील पालखेड, वावी, कुंभारी, रानवड, शिरवाडे-वणी, गोरठाण आदी परिसरात काल सायंकाळी व मध्यरात्रीच्या सुमारास ढगफुटीसदृश्य पाऊस (Rain) झाल्याने द्राक्ष उत्पादकांसह शेतकरी (Farmers) हतबल झाले आहे अचानक आलेल्या या आसमानी संकटाने शेतकऱ्यांचे कोट्यावधी रूपयाचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे...

तालुक्यासह या परिसरातील द्राक्ष उत्पादकांच्या द्राक्ष छाटणीने वेग घेतला आहे. छाटणी केलेल्या द्राक्षवेलींवर आलेला नवीन फुटवा काही ठिकाणी पावसाच्या थेंबामुळे तुटुन पडला आहे तर फुलोरा अवस्थेत असलेल्या द्राक्षघडांची कुज मोठ्या प्रमाणात होणार आहे.

फुलोरा अवस्थेतील द्राक्षबागांची जर या पावसाने हानी झाली तर उत्पादकांचा संपूर्ण हंगाम वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यातच पावसाने विश्रांती घेतली नाही तर फुलोरा अवस्थेतील बागांचे शंभर टक्के नुकसान होऊन उत्पादकांना लाखोंचा आर्थिक फटका बसणार आहे.

परतीच्या पावसाने द्राक्ष उत्पादकांवर अस्मानी संकट
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; सहा जणांचा मृत्यू

विविध प्रकारची बुरशी नाशके फवारतांनाही उत्पादकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुसळधार पावसाने (Rain) जमीन पूर्णपणे दलदलीची झाल्याने फवारणीकरीता बागेत ट्रँक्टरही चालत नसल्याने पर्यायाने हाताने फवारणी करावी लागत आहे. ही फवारणी होते ना होते तोच पावसाचे आगमन होत असल्याने फवारणी केलेली महागडी बुरशी नाशके पावसाच्या पाण्याने धुऊन जात आहे. यामुळे आर्थिक फटका उत्पादकांना बसू लागल्याने उत्पादक आसमानी-सुलतानी संकटात सापटला आहे.

परतीच्या पावसाने द्राक्ष उत्पादकांवर अस्मानी संकट
मालेगावमधील 'या' भागात ढगफुटीसदृश्य पाऊस, पिकांचे मोठे नुकसान; 'पाहा' व्हिडीओ...

गेल्या काही दिवसांपूर्वीच याच परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले होते. या परिस्थितीतून शेतकरी वर्ग सावरतो ना सावरतो तोच काल पुन्हा ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळल्याने रब्बी हंगामातील सोयाबिन, मका आदी पिकांचेही नुकसान होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

ओला दुष्काळ जाहीर करावा

पालखेडसह परिसरातील सर्वच गावात गेल्या काही दिवसांपूर्वी व काल ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे कधीही न भरून येणारे आर्थिक नुकसान झाले आहे. सर्वच पिकांची पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

परतीच्या पावसाने द्राक्ष उत्पादकांवर अस्मानी संकट
अयोध्येतील राम मंदिर पाडून...; नाशिक कोर्टात 'पीएफआय' संबंधित धक्कादायक खुलासा

द्राक्ष उत्पादकांची अवस्था तर अतिशय वाईट आहे. वर्षभर पोटच्या पोराप्रमाणे द्राक्षवेलींची जोपासना करूनदेखील हातातोंडाशी आलेला घास निसर्ग अशा पद्धतीने हिरावून घेत असेल तर त्याची दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी पिंपळगांव बाजार समितीचे माजी संचालक तथा गोरठाणचे द्राक्ष उत्पादक माधव ढोमसे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com