सलग तीन महिने चालणार द्राक्ष महोत्सव; 'या' शुभ मुहूर्तावर होणार शुभारंभ

सलग तीन महिने चालणार द्राक्ष महोत्सव; 'या' शुभ मुहूर्तावर होणार शुभारंभ

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

निसर्गाचा सामना करत, तर कधी माला घेऊन पैसे बुडवणारे व्यापारी, उत्कृष्ट प्रत असूनही मातीमोल मिळणारे दर, अशा संकटांचा सामना करत त्रस्त झालेल्या जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकाना (Grape growers) आणि नाशिककरांना हक्काचे पण उत्कृष्ट प्रतीच्या द्राक्षांपासून वंचित राहावे लागत आहे.

त्यामुळे शेतकरी (farmers) आणि ग्राहकांमधील दरी कमी करण्यासाठी कृषी विभाग (Department of Agriculture), पोलिस प्रशासन (Police Administration) आणि द्राक्ष उत्पादकांच्या (Grape growers) संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये सलग तीन महिने चालणाऱ्या द्राक्ष महोत्सवाचे (Grape Festival) आयोजन महाशिवरात्री (mahashivratri) पासून आयोजन करण्यात आले आहे. या द्राक्ष महोत्सवाच्या लोगोचे अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या हस्ते शनिवारी (दि.११) करण्यात आले. या महोत्सवामध्ये पोलीस कर्मचारी, अधिकार्यांच्या कुटुबातील सदस्यही प्रथमच सह्भागी होणार आहेत.

थंडी (cold), गारपिट आणि कोविडमध्ये द्राक्ष उत्पादकांवर कर्जाचे डोंगर उभे राहिले आहेत. यंदा द्राक्षासाठी चांगले वातावरण असल्याने आतापर्यंत द्राक्षांना किरकोळ बाजारात चांगले दर मिळत आहे. नाशिककरांना उत्कृष्ट प्रतीचे द्राक्ष खाण्यास मिळावे, यासाठी ग्रीनफिल्ड ऍग्रोचे अमोल गोऱ्हे यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शेतकरी हितासाठी सामील करून घेतले आहे.

यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Commissioner of Police Ankush Shinde) यांनी शेतकऱ्यांच्या द्राक्षांना स्थानिक पातळीवर चांगला दर प्राप्त व्हावा, शहरवासीयांना चांगले द्राक्ष खाण्यास मिळावे आणि पोलीस कर्मचारी बांधवांच्या कुटुंबातील मुला मुलींना याबरोबरच इतर सदस्यांना आपण सामाजिक दायित्वात सहभागी होण्याचा आनंद मिळावाहा यामागचा उद्देश असल्याचे सांगितले.

नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांच्या हितासाठी द्राक्ष महोत्सव होत असून ग्राहकांनाही चांगल्या दर्जाचे द्राक्ष खाण्यास मिळणार आहे.त्यामुळे आपण स्वतः द्राक्ष महोत्सवात सामील होणार असून शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त मदत करणार आहे.

- राधाकृष्ण विखे पाटील,महसूल मंत्री,महाराष्ट्र राज्य

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com