शेवगा लागवड योजनेंतर्गत मिळणार 'इतके' अनुदान

शेवगा लागवड योजनेंतर्गत मिळणार 'इतके' अनुदान
शेवगा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान (अनुसूचित जाती उपयोजना) अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील (Scheduled Caste Category) शेतकरी (Farmer) पशुपालकांना वैरणीसाठी शेवगा (Drumstick) लागवड करण्यासाठी प्रति हेक्टरी ३० हजार प्रति लाभार्थी अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी नाशिक जिल्ह्यास (Nashik District) १५ हेक्टर क्षेत्राकरिता ४ लाख ५० हजारांचे अनुदान (Grant) वितरित करण्यात आले आहे....

वैरणीसाठी शेवगा लागवड योजनेअंतर्गत प्रति हेक्टरी ७.५ किलो शेवगा बियाण्याची किंमत ६ हजार ७५० व उर्वरित २३ हजार २५० अनुदान लाभार्थ्यांना दोन टप्प्यांमध्ये वितरित करण्यात येईल. यात पशुपालकांना बियाण्याचा थेट पुरवठा करण्यात येणार असून उर्वरित अनुदानातून जमिनीची मशागत व लागवड खतांची खरेदी खर्चासाठी देण्यात येईल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी पशुपालकांनी जिल्ह्याच्या पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती किंवा नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बी. आर. नरवाडे (Dr. B. R. Narwade) यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.