करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना अनुदान

करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना अनुदान
करोना

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोनामुळे मृत्यू झालेल्या Death Due to Corona रुग्णांच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान Grants वाटपास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील 257 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर हे अनुदान वितरीत झाले आहे. 4,502 लाभार्थी कुटुंबांना अनुदान मंजूर झाले आहे. त्यापैकी 2,815 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर हे अनुदान लवकरच जमा होईल, असे जिल्हा प्रशासनाकडून District Administrationआज सांगण्यात आले.

करोनामृतांच्या कुटुंबांना आर्थिक हातभार लागावा म्हणून 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 8,765 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आयसीएमआर पोर्टलवर झाली आहे. संबंधित मृतांच्या नातलगांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

करोनाबाधितांचा हॉस्पिटलमध्ये किंवा एक महिन्याच्या कालावधीत घरी मृत्यू झाला असेल तर अशा मृतांचे नातलग अर्ज करू शकतात, अशा सरकारच्या मार्गदर्शक सूचना आहेत. त्यामुळे आतापर्यंत 12,286 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 7,982 अर्ज नाशिक शहरातून प्राप्त झाले आहेत.

पात्र लाभार्थींना सानुग्रह अनुदान वाटप सुरु झाले आहे. आतापर्यंत 4,502 जणांना सानुग्रह अनुदान मंजूर झाले आहे. त्यापैकी 257 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदान वर्ग झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांनी दिली. अनुदान वितरण प्रक्रिया मंत्रालयस्तरावरून होत आहे. 2,815 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर लवकरच हे अनुदान जमा होईल, असेही प्रशासनाने सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com