अनुदान तत्काळ वितरित करावे
नाशिक

अनुदान तत्काळ वितरित करावे

आ. सीमा हिरे यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Abhay Puntambekar

नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या पात्र निराधार नागरिकांचे अनुदान गेल्या कित्येक दिवसांपासून मिळालेले नसल्याने त्यांना आपला उदरनिर्वाह करताना कसरत करावी लागत आहे. याबाबत अनेक तक्रारी आ. सीमा हिरे यांना प्राप्त झाल्याने त्यांनी याची तत्काळ दखल घेऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे सदर योजनांचे अनुदान तत्काळ वितरित करण्याची मागणी केली आहे.

आ.हिरे यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, याबाबत अनेकदा या विषयाकडे आपले लक्ष वेधले आहे. अनेक नागरिकांना घरात कुणीही आधार नसल्याने त्यांची उदरनिर्वाहाची गैरसोय होत आहे. अशा नागरिकांना एकमेव आधार आहे तो या योजनेचा; परंतु गेल्या कित्येक महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थींना अद्याप अनुदान मिळलेले नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे.

तरी नाशिक शहरातील तसेच पश्चिम मतदारसंघातील पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेचे अनुदान तत्काळ वितरित होण्याबाबतची आपल्या स्तरावरून कार्यवाही व्हावी. शासनस्तरावरून सदरचे अनुदान प्राप्त झालेले नसल्यास त्याबाबत आपल्या स्तरावरून पाठपुरावा करण्यात यावा. या योजनांचे अनुदान तत्काळ पात्र लाभार्थींच्या खात्यात वर्ग करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com