सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या : जरांंगे-पाटील

सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या : जरांंगे-पाटील

वावी | वार्ताहर | Vavi

मराठा आणि कुणबी एकच असल्याचे हजारो पुरावे शासन दरबारी पडून आहे. त्यामुळे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याशिवाय शासनाकडे दुसरा पर्याय नाही. राज्यपालांच्या परवानगीने एक दिवशी अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण कायदा पारित करणे अपेक्षित होते मात्र पुराव्या शोधण्यासाठी शासनाच्या कमिटीला हैदराबादला हेलपाटे मारून ५००० पुरावे मिळाले मग शासनाला आरक्षण देण्याला अडचण का येत, असे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

पांगरी येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी हरिभाऊ तांबे, सानिका पांगारकर, सुभाष कुंभार, दत्ता वायचळे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, राजेंद्र चव्हाणके,नामदेव कोतवाल, भाऊसाहेब शिंदे, प्रा. राजाराम मुंगसे, शरद शिंदे, छावा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर चव्हाण ,करण गायकर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगरकर आदी उपस्थित होते.

गेल्या २६ दिवसापासून पांगरी येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी तसेच सिन्नर तालुका दुष्काळ जाहीर करावा व दुष्काळ परिस्थिती दुष्काळी भागात चारा छावण्या सुरू कराव्या अशा विविध मागण्यांसाठी मोठ्या स्वरूपाचे साखळी उपोषण सुरू आहे मात्र या उपोषणादरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री यांना उपोषण करताना भेट देण्यासाठी वेळ नसल्याचे छावा संघटनेचे अध्यक्ष किशोर चव्हाण म्हणाले.

आमचे पूर्वज जर तुकाराम महाराजांचे वंशज होते आणि तुकाराम महाराज हे कुणबी होते मग आम्ही कुणबी असल्याचे आणखी काय पुरावे सादर करायचे असे मत विलास पांगारकर यांनी व्यक्त केले. यावेळी सर्वपक्षीय मराठा समाजातील अनेक मातब्बर नेते याप्रसंगी उपस्थित होते.

सभेचे नियोजन करण्यासाठी पांगरी येथील माजी सरपंच ज्ञानेश्वर पांगरकर, संपत पगार, मयूर पांगरकर, आत्माराम पगार, भाऊसाहेब पगार, संदीप पगार, सोमनाथ निरगुडे, प्रकाश पांगरकर, निखिल पांगरकर, जगदीश पांगरकर, सुनील काटे, हिरामण दळवी, राजू पगार, भाऊसाहेब निरगुडे ,आनंद दळवी, आदींसह पांगरी ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी पालवे तसेच वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com