'ति'च्या जन्माच्या स्वागताने फुलले शासकीय रुग्णालय

'ति'च्या जन्माच्या स्वागताने फुलले शासकीय रुग्णालय

नाशिक । प्रतिनिधी Nashik

वंशाच्या दिव्याच्या हव्यासापोटी मुलगी नको ही मानसिकता बदलावी या उद्देशाने मुलीच्या जन्माचे स्वागत आनंदाने झाले पाहिजे, तिचा सांभाळ व शिक्षण देखील झाले पाहिजे हा संदेश देण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नवरात्रीच्या दुर्गष्टमीच्या दिवशी जन्मलेल्या मुलींच्या जन्माचे स्वागत औंक्षण करून ,सनई , फुलांची सजावट व सनई वादनात करण्यात आले. या उत्सवाने भारावलेल्मा स्वागताने शासकीय रुग्णालय फुलले...

हा कार्यक्रम प्रसुती कक्षाच्या मागील बाजूस आयोजित करण्यात आला होता. प्रसुती झालेल्या पेठ तालुक्यातील कारंजाळी येथे राहणाऱ्या निकीता चारोस्कर या मातेचा साडी, ओटी, नवजात लक्ष्मीस ड्रेस व तिचे वडील दिपक चारोस्कर यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित केले.

या कार्मक्रमास कार्मक्रमास अति. जिल्हा शल्मचिकित्सक डॉ. श्रीवास, निवासी वैद्यकीम अधिकारी डॉ.प्रशांत खैरे तसेच मुख्य प्रक्षासकीय अधिकारी व्हि. डी. पाटील, राष्ट्रीय आरोग्य अभियान सहाय्यक अधिक्षक रमेश पगारे, फायनान्स अधिकारी विद्या जोशी, कार्मालयीन अधीक्षक निता पाटील, अधिसेवीका वंदना झुजाड तसेच अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Related Stories

No stories found.