तब्बल २५ हजार स्वेअर फुटांची भव्य महारांगोळी !

तब्बल २५ हजार स्वेअर फुटांची भव्य महारांगोळी !

नाशिक | प्रतिनिधी | Nashik  

नाशिक महानगर पालिका (Nashik Municipal Corporation) व मराठी नववर्ष स्वागत यात्रा समिती नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तिसऱ्या दिवशी सोमवार (दि. २० मार्च) रोजी नाशिक येथील पाडवा पटांगण, पंचवटी येथे पर्यावरण रक्षण या अंतर्गत पंचमहाभुते या विषयाला अनुसरुन तब्बल २५ हजार स्क्वेअर फुटांची (२५० फूट बाय १०० फूट) भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे.

पर्यावरणाचा (environment) समतोल बिघडण्यासाठी आपणच जबाबदार आहोत हे दाखवण्यासाठी वृक्षतोड, वायूप्रदूषण, ध्वनीप्रदूषण, रासायनिक खतांचा अती वापर, जलप्रदूषण या गोष्टींचा अंतर्भाव असलेले रांगोळीचित्र रेखाटण्यात आले आहेत. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून वितळणारे बर्फ, पूर परिस्थिती, दुष्काळ, पृथ्वीचे वाढलेले तापमान हे नाविन्यपूर्ण पद्धतीने रांगोळीचित्रात रेखाटले आहेत. या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून वृक्षारोपण, हरित उर्जेचा वापर, अग्निहोत्र, तुळस यासारख्या विषयांची मांडणी करण्यात आली आहे. पर्यावरणाचा बिघडलेला समतोल राखण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे म्हणून वसुधैव कुटुंबकम् असे मोठ्या अक्षरात रेखाटले आहे.

तब्बल २५ हजार स्वेअर फुटांची भव्य महारांगोळी !
जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात बैठकीत नेमकं काय ठरलं? मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

या महारांगोळी साठी एकूण २५०० किलो रंग आणि २००० किलो रांगोळीचा वापर करण्यात आला असून २०० महिलांनी अवघ्या तीन तासांत एकत्रितपणे येऊन ही महारांगोळी साकारली.

या महारांगोळीची (Maharangoli) संकल्पना पूर्णत्वास उतरवण्यासाठी निलेश देशपांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन होते. यावेळी भारती सोनवणे यांनी महारांगोळी प्रमुख म्हणून काम पहिले तर, मंजुषा नेरकर व सरोजिनी धानोरकर यांनी सहप्रमुख म्हणून काम पहिले,

सकाळी ६ वाजता या महारांगोळीचा पहिला बिंदू हा काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात (Kalaram temple Satyagraha) महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम केलेल्या मेघवाल समाजाचे समाजसेवक रामजी पाळजी मारू, यांच्या सूनबाई श्रीमती हिरुबेन धुडा मारू व श्री राम पला मारू, दिपाली गीते यांच्या हस्ते ठेवण्यात आला होता.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

ही महारांगोळी पाडवा पटांगणावर (Padwa Patangan) दोन दिवसाकरिता ठेवण्यात येणार असून जास्तीत जास्त नाशिककरांनी ती बघण्यासाठी पाडवा पटांगणावर यावे असे आवाहन या सर्व कार्यक्रमांना नाशिककर नागरिकांनी मोठया प्रमाणात उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Dr. Chandrakant Pulkundwar) आणि नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक चे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, उपाध्यक्ष राजेश दरगोडे, सचिव योगेश गर्गे व संघटक जयंत गायधनी यांनी केले आहे.

तब्बल २५ हजार स्वेअर फुटांची भव्य महारांगोळी !
सहायक प्राध्यापकांसह महाविद्यालयातील 'ही' पदे भरण्यास वित्त विभागाची मान्यता
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com