
नाशिक | प्रतिनिधी Nashik
एका नातीने (Grand Daughter) तिच्या आजीचा 90 वा वाढदिवस ‘पुस्तक पिशवी’ (Pustak Pishavi) देऊन साजरा केला. नात मलेशियात (Malaysia) तर आजी नाशिकमध्ये. या दोघींमध्ये दुवा होण्याचे काम केले ‘ग्रंथ तुमच्या दारी’, (granth tumchya dari) आणि ‘ माझी पुस्तक पिशवी’ (Majhi Pustak Pishavi) ही संकल्पना राबवणार्या विनायक रानडे (Vinayak Ranade) यांनी. नातीने रानडे यांच्याशी व्हॉटसअॅपवर संपर्क साधला होता....
मलेशियातील मोहना धारडे (Mohana Dharade) यांनी आजीच्या वाढदिवसाला पुस्तके भेट देण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी यशवंतराव चव्हाण ग्रंथालयाच्या ‘माझी पुस्तक पिशवी’ या योजनेची मदत घेतली.
दिवाळीची सुट्टी असली तरी पुस्तके आजींपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयाच्या सेवकांनी आणि या योजनेच्या समन्वयकांना विनंति केली.
योजनेचे समन्वयक मंगेश बिरारी यांनी आजींच्या वाढदिवशी त्यांच्या घरी जाऊन नातीची पुस्तके भेट आजीपर्यंत पोहोचवली. यासाठी सचिन हांडे, ज्ञानेश्वर शिरसाठ यांनी त्यांना सहकार्य केले.