
येवला| प्रतिनिधी
येवला पंचायत समितीच्या वतीने मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत भव्य अमृत कलश यात्रा काढण्यात आली भारत देशाची प्राचीन संस्कृती आणि प्राचीन कला पुढे नेण्याचं काम या निमित्ताने होणार असून हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक व राष्ट्रीय भावना जोडण्याचं काम हा कलश करणार आहे.
देशातील प्रत्येक गावातून अमृत कलश दिल्लीत जाणार आहे असे केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री भारती पवार यांनी सांगितले डॉक्टर भारती पवार स्वतः अमृत कलश घेऊन या यात्रेत सहभागी झाल्या होत्या सर सेनापती तात्या टोपे स्मारक येथून रथमात्रेला सुरुवात करण्यात आली.
प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे,तहसीलदार आबा महाजन,बीडीओ अभिजीत पाखरे, गटशिक्षण अधिकारी संजय कुसाळकर, संजय कुमावत,भाजपचे जिल्हाअध्यक्ष शंकरराव वाघ, आंनद शिंदे, मिननाथ पवार, बडा अण्णा शिंदे,अनुपमा मढे, राजुसिंग परदेशी, तालुक्यातील ग्रामसेवक,आशा सेविका,व विदयार्थी सहभागी झाले होते दरम्यान विंचूर चौफुली येथे जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण करण्यात आली.त्यानंतर पंचायत समिती येथे कार्मक्रमाचा समारोप करण्यात आला.