ग्रामसेवक लाचलुचपतच्या जाळ्यात!

ग्रामसेवक लाचलुचपतच्या जाळ्यात!

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शासकीय घरकुल योजनेंतर्गत (Government housing scheme) बांधकाम केलेल्या शौचालयाच्या प्रकरणाचा अहवाल फिर्यादी यांच्या बाजूने तयार करून गटविकास अधिकाऱ्यांना पाठविण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ग्रामसेवकावर कारवाई करण्यात आली आहे.... (25 thousand bribe case chandwad)

याप्रकरणी फिर्यादी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने आज संशयित चंद्रकांत पाटील ग्रामसेवक दहेगाव (म) ता. चांदवड (Chandwad) यांस तडजोडी अंती ठरलेले २५ हजार रुपयांची लाच स्वीकारली.

ग्रामसेवकाच्या विरुद्ध चांदवड पोलिस ठाण्यात (Chandwad Police Station) ५७४/२०२१ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.