ग्रामपंचायत निवडणूक निकाल : भाटवाडीवर वाजे तर मोहवर कोकाटे गटाची सत्ता

ग्रामपंचायत निवडणूक निकाल : भाटवाडीवर वाजे तर मोहवर कोकाटे गटाची सत्ता

सिन्नर। Sinnar

तालुक्यातील भाटवाडी ग्रामपंचायतवर (Bhatwadi Grampanchayat) माजी आमदार राजाभाऊ वाजे (Former MLA Rajabhau Waje) तर मोह ग्रामपंचायवर माणिकराव कोकाटे (MLA Manikrao Kokate) गटाच्या उमेदवारांनी बाजी मारली....

भाटवाडी ग्रामपंचायतीच्या (Bhatwadi Grampanchayat) निवडणुकीत माजी आ. वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज महात्मे यांच्या नेतृत्वाखाली जनशक्ती पॅनलने सर्व जागांवर वर्चस्व प्राप्त केले. 7 जागांपैकी 2 जागा याआधीच बिनविरोध झाल्या होत्या.

वार्ड क्रमांक 1 मधुन मनोज निवृत्ती महात्मे व वार्ड क्र. 3 मधुन शिला नवनाथ पिठे यांची बिनविरोध निवड झाली होती. उर्वरित 5 जागांसाठी झालेल्या निवडणूकीत प्रभाग क्र. 1 मधून सर्वसाधारण महिला गटातून वैशाली सोमनाथ लोंढे (241), मनिषा सोमनाथ गोळेसर (239) या विजयी झाल्या तर रुपाली संदिप लोणारे (105) यांना पराभव पत्कारावा लागला.

प्रभाग क्र. 2 मधून अनुसुचित जमाती गटातून द्रोपदाबाई गोपीनाथ डगळे (187) या विजयी झाल्या.त्यांनी सुनिल मधुकर डगळे (106) यांचा पराभव केला. तर सर्वसाधारण महिला गटातून लिलाबाई कैलास पाचोरे (164) यांनी गौरी सागर पाचोरे (132) यांचा पराभव केला.

प्रभाग 3 मधून सर्वसाधारण गटातून विकास अशोक महात्मे (170) हे विजयी झाले. त्यांनी आकाश राजेंद्र पाचोरे (73) यांचा पराभव केला. निकालानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांसह समर्थकांनी गुलालाची उधळण केली.

विजयी उमेदवारांनी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासोबत बस स्थानकाजवळील महात्मा फुले पुतळ्यास अभिवादन करुन जल्लोष साजरा केला. मोह ग्रामपंचायतवर आमदार माणिकराव कोकाटे समर्थक सुदाम बोडके यांच्या पॅनलने वर्चस्व प्रस्तावित केले.

प्रभाग क्र. 1 मधून अनुसुचित जाती गटातून मच्छिंद्र भागोजी अंभोरे (245) यांनी विजय मिळवला. त्यांनी उत्तम मनोहर रामराजे (209) यांचा पराभव केला.

तर सर्वसाधारण महिला गटातून शकुंतला त्र्यंबक ढोन्नर (250) व पुजा संदिप बिन्नर (230) यांचा विजय झाला. त्यांनी राधिका भारत बेंडके (216) व यशोदा अंबादास सदगीर (222) यांचा पराभव केला. प्रभाग क्र. 2 मधून सर्वसाधारण गटात संपत लक्ष्मण भिसे (368) यांचा विजय झाला. त्यांनी कैलास एकनाथ ढेरिंगे (357) यांचा पराभव केला.

अनुसुचित जमाती महिला गटातून सविता राधाकिसन कोतोरे (384) यांचा विजय झाला. त्यांनी सुरेखा तानाजी माळी (339) यांचा पराभव केला. सर्वसाधारण महिला गटातून पिलाबाई निवृत्ती बोडके (368) यांनी पूनम समाधान दराडे (357) यांचा पराभव केला.

प्रभाग क्र. 3 मधून अनुसुचित जमाती गटातून उत्तम काभू माळी (387) यांचा विजय झाला. त्यांनी योगेश दत्तू माळी (267) यांचा पराभव केला. सर्वसाधारण गटातून प्रदिप मल्हारी साळवे (376) यांनी भगवान नामदेव होल्गीर (281) यांचा पराभव केला. सर्वसाधारण महिला गटातून बेबी दत्तात्रय भिसे (386) यांचा विजय झाला. त्यांनी सरस्वती देवानंद शिंदे (267) यांचा पराभव केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com