
नाशिक l Nashik
भरधाव मर्सिडीज कारने धडक दिल्याने सेवा बजावून दुचाकीवर घराकडे परतणाऱ्या ग्रामिण पोलीस दलातील अधिकाऱ्याचा मृत्यू झाला.
हा अपघात महामार्गावरील शेरे पंजाब ढाबा परिसरात झाला.
याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कार चालकास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.